baba ramdev  Team esakal
मनोरंजन

'बाबा रामदेव म्हणजे कोरोना व्हायरस, कधीही येतो, कधीही जातो'

राखीनं कोरोनाची तुलना बाबा रामदेव यांच्याशी केली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम प्रसिध्दीच्या मागे धावणा-या राखी सावंतनं (rakhi sawant) आता रामदेव बाबांवर (baba ramdev) एक प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी अॅलोपॅथीवरील (satire on allopathy) टीकेमुळे बाबा रामदेव वादाच्या भोव-यात सापडले होते. त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. मात्र रामदेव बाबा आपल्या मतांवर ठाम होते. त्यांनी सोशल मीडियावर एक प्रश्नावली तयार करुन त्याची उत्तरे आयएमच्या सर्व डॉक्टर्सला देण्याचे आव्हान दिले होते. यासगळ्या प्रकरणात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लक्ष घातले होते.( rakhi sawant compares coronavirus to baba ramdev says kabhi aata hai kabhi chala jata hai)

बॉलीवूडची अभिनेत्री राखी सावंतनं (rakhi sawant) बाबा रामदेव (baba ramdev) यांच्यावर एक गंमतीशीर टिप्पणी केलीय. ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीय. बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री म्हणूनही राखीची ओळख आहे. बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये तिनं मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली होती. ती अंतिम तीन स्पर्धकांच्या यादीतही होती. मात्र तिनं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्या स्पर्धेत बक्षीसाची रक्कम घेऊन ती बाहेर पडली होती.

आपल्या मतांवर ठाम असणा-या राखीनं बाबा रामदेव यांच्यावर कड़वट प्रतिक्रिया दिली आहे. राखी कुठल्याही प्रश्नावर बोलु शकते त्याचा प्रत्ययही यावेळी आला आहे. राखीनं कोरोनाची तुलना बाबा रामदेव यांच्याशी केली आहे. तिच्या अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. राखीनं म्हटलं आहे, अरे देवा काय हा कोरोना आहे. तो बाबा रामदेव यांच्यासारखाच आहे. कधी पण येतो आणि कधी पण जातो. तो कुठेही लपून बसतो या शब्दांत तिनं बाबा रामदेव यांची टर उडवली आहे. यावर काही युझर्सनं तिला तु अगदी योग्य प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाची रिपरिप, हवामान विभागाचा अंदाज

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

SCROLL FOR NEXT