Rakhi Sawant & devoleena bhattacharjee Google
मनोरंजन

''हजार चुड़ैल मरी होंगी तब जाके...''राखीच्या तोंडाचा लगाम सुटला...

बिग बॉसच्या घरात अशा शब्दात घेतला देवोलिनाचा समाचार की ....पहा व्हिडीओ

प्रणाली मोरे

मराठी बिग बॉस संपला तरी बिग बॉस या कन्सेप्टला उचलून धरणा-या प्रेक्षकांसाठी अजूनही बिग बॉस हिंदी सिझन १५ मनोरंजनासाठी दिमतीला हजर आहे. मराठीपेक्षा हिंदी बिग बॉसमधले वाद टोकाचे. तिथे कधी काय घडेल याचा अंदाज लावणं कठीण. बिग बॉस पाहताना तोंड,कान,डोळे झाकण्यासाठी हात गेलेच पाहिजेत. असो सांगायचा मुद्दा असा की आता हिंदी बिग बॉस सिझन १५ मध्ये टिकट टू फिनाले साठी चुर्र्स सुरू आहे. यात करण,तेजस्वी,उमर रियाज 'टिकट टू फिनाले'मध्ये एन्ट्री मिळवण्यात असफल राहिले आहेत तर रश्मी देसाई आणि अभिजित बिचुकले यांना इतर घरवाल्यांनी नॉमिनेट केलंय. फिनाले आधी या पाच जणांपैकी कुणीतरी घराबाहेर पडणार आहे.

आता प्रश्न उरला की हे सगळं ठीक आहे पण एवढ्या जीवाभावाच्या दोन घट्ट मैत्रिणी राखी-देवोलिनात असं काय घडलं की राखी थेट तिला 'चेटकीण' म्हणाली. तर त्याचं झालं असं की हिंदी बिग बॉसच्या घरात आता काही गोष्टी अशा घडत आहेत की ज्यामुळे मित्र दुश्मन बनत चालले आहेत आणि दुश्मन एकमेकांचे मित्र बनतायत. हे का आणि कसं होतंय हे कुणालाच कळत नाही आहे. तर आपण बोलतोय राखी-देवोबद्दल. या दोघीही वाइल्ड कार्ड एन्ट्रीनं बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळालेल्या. आता-आतापर्यंत आल्यापासनं यांच्यात छान मैत्री फुलली होती. मात्र एक असा टास्क झाला ज्यानं या दोघींमधलं मैत्रीचं विश्वच नेस्तनाबूत करून टाकलं.

राखी-देवोलिनात रंगलेल्या वादाचा हा व्हिडीओ नक्की पहा.

तर बिग बॉसच्या घरात एक टास्क खेळला जात होता. ज्यात एका बॉक्समध्ये पाच जणांच्या एका ग्रुपला पुढचे काही तास एका ठिकाणी हालचाल न करता बसायचे होते. तर इतर ग्रुपमधल्यांना त्यांना तिथून बाहेर काढायचे होते. देवोलिना बॉक्समध्ये बसलेल्यांना बाहेर काढण्यासाठीचे पूर्ण प्रयत्न करीत होती. पण हे पाहून एका क्षणाला देवोलिनानं असं काही केलं की बॉक्समध्ये बसलेल्या राखीचा पारा चढला आणि बेलगाम घोड्याप्रमाणे ती देवोलिनावर मुक्ताफळ उधळू लागली. ती म्हणाली,'हजार चुडैल मरीं तो तू एक पैदा हुई,थू है तेरी जिंदगी पर...यावर देवोलिनानेही राखीचा समाचार घेतला पण राखीच्या पुढे कोणाचं कधी काही चाललं आहे का. बिचारी देवोलिना ढसाढसा रडू लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : कागल मध्ये मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाची माघार

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

SCROLL FOR NEXT