Rakhi Sawant claims ex-husband Adil Khan Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant Reaction: 'गर्भपात..मारहाण..फसवणुक..फायदा अन् भिकारी आदिल'! राखी सावंतचा पलटवार

Vaishali Patil

Rakhi Sawant claims ex-husband Adil Khan: ड्रामा क्वीन राखी सावंत ही नेहमी चर्चेत राहणारी व्यक्ती आहे. गेल्या काही दिवासांपुर्वी तिचं आणि आदिलचं प्रकरण शांत झालं होत मात्र आता पुन्हा एकदा ती वादात आणि चर्चेत आली आहे.

राखीने आदिलवर अनेक आरोप लावले. त्यानंतर तो 6 महिने तुरुंगात राहिला आणि आता तो जामिनावर बाहेर आला आहे. मात्र बाहेर येताच त्याने राखीवर अनेक गंभीर आरोप केले आणि त्याच्याकडे याबाबत पुरावे असल्याचे देखील सांगितले.

आदिलनं पत्रकार परिषद घेत याबाबत संपुर्ण माहिती सांगितली. राखीने त्याचे न्यूड व्हिडिओ बनवले ,ड्रग्ज दिले आणि आदिलने तिच्यावर लाखो कोटी रुपये खर्च केले असे अनेक आरोप आदिलने राखीवर केले.

आता आदिलने लावलेल्या सर्व आरोपांवर उत्तर देण्यासाठी राखीने देखील एक पत्रकार परिषद घेतली. 22 ऑगस्ट 2023 रोजी राखी सावंतने ही पत्रकार परिषद घेत आदिल दुर्राणीच्या सर्व आरोपांना उत्तर दिले.

पत्रकार परिषदेत राखीने सांगितले की, ती जन्माने हिंदू होती पण आईमुळे तिचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास होता नंतर तिने आदिलशी लग्न केले आणि आदिलने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाब टाकला आणि त्यासाठी त्याने राखीला अनेक वेळा मारहाणही केली.

राखीची मैत्रिण शैलीच्या माध्यमातून तिची आदिलसोबत ओळख झाली. तेव्हा तो छोटासा सेकंड हँड कारचा व्यवसाय करत होता. त्यावेळी राखीला कार घ्यायची होती त्यामुळे ती आदिलला भेटली होती. त्यानंतर आदिलने तिला लग्नासाठी तयार केले आणि गोव्यात लग्न केले.

पुढे राखीने सांगितले की, लग्नाच्या 8 महिन्यात आदिलने तिला खूप माराहाण केली. राखी सावंतने बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतर ती गरोदर असल्याचा खुलासा केला होता, पण तेव्हा तिला आदिलच्या अफेयरबाबत कळालं आणि तेव्हा तिचा गर्भपात झाला.

इतकच नाही तर आदिलनं तिचे न्यूड व्हिडिओ बनवले आणि ते लाखो रुपयात विकल्याचा आरोपही तिने आदिलवर केला. त्याला फक्त प्रसिद्धी पाहिजे होती. त्याला मोठमोठ्या लोकांसोबत ओळखी करायच्या होत्या.

राखीने आदिल खान कडून पैसे घेण्याच्या आरोपावर राखी म्हणाली की, "फुकरा भिकारी आदिल..त्याने एक रुपयाही आणला नाही...मी आदिलला सांगितले की तू माझ्याशी लग्न केले आहे, त्याचे प्रमाणपत्र मला दे पण त्याने मला तेही दिले नाही."

आदिलला आईच्या उपचारासाठी त्याने दहा लाख रुपये दिले असल्याचा आरोपही तिने केला. याशिवाय अनेक आरोप राखीनं केले आहेत. सध्या सोशल मीडियावर राखी सावंतचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आदिल आणि राखीच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. नेटकरी राखीच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट करत आहेत. तर काहींनी याला पुन्हा ड्रामा म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT