rakhi sawant mannat for salman khan wedding video viral on internet SAKAL
मनोरंजन

Rakhi Sawant Mannat: भाईजानचं लग्न होऊन मुलं व्हावीत, म्हणुन राखीने केलाय हा खास नवस

राखीने आता सुपरस्टार सलमान खानचं लग्न व्हावं म्हणुन अनोखी मन्नत मागीतली आहे.

Devendra Jadhav

Rakhi Sawant Mannat News: अभिनेत्री राखी सावंत ही सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असते. राखी कधी काय करेल याचा काही नेम नाही. राखीचा कोणताही व्हिडीओ आला की त्याची चर्चा होतेच.

राखी आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांचं विशेष नातं सर्वांना ठाऊकच आहे. राखीने आता सुपरस्टार सलमान खानचं लग्न व्हावं म्हणुन अनोखी मन्नत मागीतली आहे.

(rakhi sawant mannat for salman khan wedding video viral on internet)

राखीने एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडीओत राखी ब्लेझरने डोके झाकताना दिसत आहे. राखीने तिचे डोके गुलाबी रंगाच्या ब्लेझरने झाकले आहे आणि ती अनवाणी चालताना दिसत आहे.

राखी म्हणते- मी नवस केलाय. सलमान खानने लग्न करावं मी श्रीलंका, दुबई येथून विना चप्पल आली आहे. जोपर्यंत सलमानचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही."

राखी फॅन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

राखीच्या व्हिडिओवर यूजर्स खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - मग ती मरेपर्यंत चप्पल घालणार नाही. तर एकाने लिहिले - राखी पागल झाली आहे. काहीही करत राहते. त्याचबरोबर अनेक लोक हसणारे इमोजी पोस्ट करत आहेत.

अलीकडेच राखीने आदिलपासून घटस्फोट घेत असल्याने ब्रेकअप पार्टीचे आयोजन केले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी लाल रंगाचा लेहेंगा घालून नाचताना दिसत आहे. ती आपला आनंद व्यक्त करताना दिसली. ती म्हणाली होती की मी शेवटी घटस्फोट घेत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी आहेत पण मी आनंदी आहे.

राखी सावंतचे लग्न आदिल खानसोबत झाले होते. लग्नानंतर तिने आदिलवर अनेक आरोप केले होते, त्यानंतर त्याला ७ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. राखीने आदिलवर विवाहबाह्य संबंधाचा आरोपही केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT