Rakhi Sawant Mother Death Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant Mother Death: 'तुझं दुःख समजू शकतो, मी ही...', राखीच्या दु:खात जॅकी दादाही भावूक

Vaishali Patil

Rakhi Sawant Mother die: ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेली अभिनेत्री राखी सावंतची आई जया भेडा यांचे शनिवारी निधन झाले. त्याच्या जाण्याने राखी खुपचं दु:खी आहे. तिच्या आईच्या मृत्यूनंतर राखी रडत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

त्यात तिने आज माझ्या डोक्यावरून मायेचा हात गेला. आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नाही. आय लव्ह यू आई… आई, तुझ्याशिवाय काहीच नाही. आता माझी हाक कोण ऐकणार आणि कोण मला मिठी मारणार आई? मी कुठे जाऊ?; अशी भावनिक पोस्ट राखीने लिहिली आहे.

तिच्या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून तिच्या दुःखात सहभागी झाले. यातच बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीही तिच्या व्हिडिओला कमेंट केली.

राखीचं सात्वनं करतांना जॅकी दादांनी लिहिले की, “मी तुझे दुःख समजू शकतो. मी माझे आई, वडील आणि भाऊ देखील गमावले आहेत. त्याचा आत्मा सदैव आपल्यासोबत असेल."

तर संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांनी लिहिले की, "या दु:खाच्या क्षणी देव तुम्हाला सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती. त्याच्या आत्म्यास शांती लाभो."

राखीच्या आईच्या पार्थिवावर अंधेरी पश्चिमेतील महापालिकेच्या ख्रिश्चन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China reaction on Nepal Political Crisis: नेपाळमध्ये अराजकता अन् सत्तेची उलथापालथ; अखेर चीनलाही सोडावं लागलं माैन!

Pune News : दीड वर्षात तब्बल चाळीस हजाराहून नागरिक जखमी, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nandgaon News : कन्नड घाटाच्या वाहतुकीने नांदगावचे रस्ते गिळले: प्रवाशांचे हाल

Suspicious toolkit: नेपाळ, बांगलादेश अन् श्रीलंकेतील आंदोलनांमध्ये धक्कादायक साम्य; पंतप्रधानांच्या माजी सल्लागारांचा दावा

Pollution Control : 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम प्रभावीपणे राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

SCROLL FOR NEXT