rakhi sawant
rakhi sawant sakal
मनोरंजन

'ये तो बोहोत गरम है..' राखीला सहन होईना...

नीलेश अडसूळ

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंत ही (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिनं यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतच्या लॉक अप (Bollywood Actress Kangana Ranaut) या शो वरुन कंगनाचे कान टोचले होते. कंगनानं बॉलीवूडचा भाईजान सलमानवर टीका केली होती. त्यावर राखीनं कंगनानं हा शो किमान शंभर दिवस तरी चालवून दाखवावा असं विधान केलं होतं. तर मध्यंतरी मी विमान चालवू का... असे म्हणत प्रवाशांचा थरकाप उडवला होता. आता पुन्हा राखीचा एक नवीन व्हीडीओ व्हायरल झाला आहे. (Rakhi Sawant Latest Video) या व्हिडीओमध्ये नको त्या ठिकाणी बसल्याने तिला चटका लागला आहे.

राखी या व्हिडीओ मध्ये पापाराझींना पोज देत आहे. काल राखीच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस होता. तिच्या दोन मित्रांनी तिला एक गाडी गिफ्ट केली. ही गाडी साधीसुधी गाडी नसून ५० लाखांची BMW x1 आहे. अत्यंत अलीशान अशा गाडीसोबत राखी तिच्या हिपहाॅप गाण्याच्या लाँचला आली होती. यावेळी राखीने गाडीसमोर उभं राहवं अशी विनंती पापाराझींनी तिला केली. यावेळी गाडीच्या बोनेटवर बसण्याचा ती प्रयत्न करत होती.

सध्या मुंबईत उन्हाने चांगलाच कहर केलाअसल्याने गाडीचे बोनेट चांगलेच तापले होते. त्यामुळे बोनेटवर बसताना राखीला गाडीचा चांगलाच चटका बसला. यावेळी ती किंचाळली आणि गाडीच्या आत जाऊन बसली. राखीच्या त्या व्हिडिओला तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तिचे हावभाव, तिचा आवाज, तिचं बोलणं यामुळे राखी कायमच चर्चेत असते. अशातच हा नवीन व्हिडीओ समोर आल्याने पुन्हा राखीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT