salman khan and rakhi sawant google
मनोरंजन

सलमानच्या समन्सवर राखीची सुनावणी

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी सलमानला अंधेरी कोर्टानं समन्स बजावलं असून ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नीलेश अडसूळ

दोन वर्षांपूर्वी सलमान सायकल राईड करीत असताना पत्रकार अशोक पांडे यांनी सलमानचे(Salman Khan) चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. हे सलमानला आवडले नसल्याने त्याने गैरवर्तन केल्याची तक्रार पत्रकाराने केली होती. पत्रकाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार सलमान आणि त्याच्या ड्रायव्हरने कथित मारहाण केली होती. त्याला काळवीट शिकार प्रकरणात नुकताच दिलासा मिळाला असला तरी पत्रकाराशी गैरवर्तन केल्या प्रकरणी सलमानला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. या संदर्भात ५ एप्रिल राेजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी सलमान सायकल राईड करीत असताना पत्रकार अशोक पांडे यांनी सलमानचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. हे सलमानला आवडले नसल्याने त्याने गैरवर्तन केल्याची तक्रार पत्रकाराने केली होती. पत्रकाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार सलमान आणि त्याच्या ड्रायव्हरने कथित मारहाण केली होती. त्यामुळे काळवीट प्रकरणात नुकताच दिलासा मिळाला असला तरी पत्रकाराशी गैरवर्तन केल्या प्रकरणी सलमानला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. या संदर्भात ५ एप्रिल राेजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.असे असले तरी राखी सावंत हिने मात्र सलमान खानची बाजू समजून घेण्याचे निवेदन केले आहे. सलमान खान विषयी तिला असलेल्या कौतुक आणि आदराबद्दल सगळ्यांना ठाऊकच आहे. त्यामुळे यंदाही भाईजानची पाठराखण करण्यासाठी राखी पुढे सरसावली आहे.

सलमान खान समन्स विषयी राखी सावंत (rakhi sawant) ला विचारले असता तिने हे विधान केले आहे. राखी म्हणते, 'कोणताही मीडिया कधीच वाईट नसतो, परंतु जेव्हा तुम्ही मोठे स्टार होता तेव्हा काही प्रश्न तुम्हाला त्रास देतात. सलमानचे सिनेमे सुपरहिट आहेत, त्याचे लाखो चाहते आहेत पण कुठेतरी त्याला जीवनाचा आनंद मिळाला नाही. मला वाटते की त्याला सर्व काही मिळाले आहे, परंतु त्याने बरेच काही गमावलेही. जर तुम्ही एखाद्याची दुखरी नस दाबली तर त्याचे चिडणे स्वाभाविक आहे. तोही माणूस आहे. तुम्हाला माहीत नाही पण सलमान नेहमीच तणावात असतो. जेव्हा त्याचे सिनेमे रिलीज होतात तेव्हा त्याला चाहत्यांसमोर येण्याची इच्छा नसते. जर कोणी चुकीचा प्रश्न विचारला तर त्याला राग येऊ शकतो, तो सच्चा माणूस आहे म्हणून त्याने जर काही बोलले असेल तर लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असे मला वाटत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT