Rakhi Sawant: 'लव्ह यू पप्पूडी!' म्हणत आदिलने राखीसोबत झालेल्या लग्नाचा केला स्वीकार SAKAL
मनोरंजन

Rakhi Sawant: 'लव्ह यू पप्पूडी!' म्हणत आदिलने राखीसोबत झालेल्या लग्नाचा केला स्वीकार

आदिल या लग्नापासून खुश नसल्याचं बोललं जात होतं. आता त्यातच आदिलने शेवटी त्याचं मौन सोडलं.

Devendra Jadhav

बिग बॉस मराठी ४ मध्ये राखी सावंत सहभागी झाली होती. अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. तर दुसरीकडे तिने तिचा प्रियकर आदिलसोबतच्या लग्नाचा खुलासा केला आहे. तेव्हापासून राखी आणि आदिल सतत चर्चेत आहेत.

व्हिडीओ आणि फोटो शेअर करून राखीने आदिलसोबत लग्न केल्याचा पुरावाही सादर केला. मात्र आदिलने याबद्दल काही बोलणं टाळलं. त्यामुळे तो या लग्नापासून खुश नसल्याचं बोललं जात होतं. आता त्यातच आदिलने शेवटी त्याचं मौन सोडलं. आदिलने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करून राखी सोबत झालेल्या लग्नाचा स्वीकार केलाय. 'लव्ह यु पप्पूडी' असं म्हणत आदिलने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

आदिलने सोशल मीडियावर लग्नाचा फोटो पोस्ट करत म्हणाला, "मी शेवटी एक घोषणा केली, मी राखीशी लग्न केले नाही असे कधीच म्हटले नाही. फक्त काही गोष्टी शांतपणे हाताळायच्या होत्या. पप्पूडी, हॅप्पी मॅरीड लाईफ" अशी पोस्ट करत आदिलने राखीबद्दल प्रेम दर्शवलं आहे.

आता आदिलने पत्नी म्हणून राखीचा स्वीकार केल्याने राखी सुद्धा खुश झाली आहे. तिने कमेंट 'धन्यवाद जानू! खूप प्रेम' अशी कमेंट करून मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राखीच्या फॅन्सनी हि खुशखबर ऐकताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

याआधी राखीने सांगितले की, तीन महिने डेट केल्यानंतर तिने मागच्या वर्षी आदिलशी लग्न केले. मात्र आदिलने याला नकार देत आपले लग्न खोटे असल्याचे सांगितल. आदिलने आपले लग्न झाल्याचे स्पष्ट केलं तरीही त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप तिला पत्नी म्हणून स्वीकारलेले नाही. दुसरीकडे, रडत रडत राखीची वाईट अवस्था झाली आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT