Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: राखीचा नवरा सलमानला घाबरला म्हणुन...आदिल खानबद्दल मोठा खुलासा

Vaishali Patil

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. तिनं प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत लग्नाचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, यानंतर आदिलने लग्नाला नकार दिल्याने राखीची स्थितीत खूपच अस्वस्थ झाली होती.

त्यांनतर राखीचा आणि आदिलचा ड्रामा काही दिवस सुरु राहिला आणि काल आदिलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून राखीसोबत लग्न केल्याची कबूली दिली. तो लग्न का मान्य नव्हत यामागचं कारणं काय याबद्दल त्याने सांगितलं नसलं तरी त्याने आता लग्न का मान्य केलं याबाबत खुलासा केला आहे. राखीने तिचे लग्न वाचवण्यामागे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा हात असल्याचा खुलासा केला आहे.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीचे सात महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. यानंतर अचानक राखीने तिच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर आदिलने आधी नकार दिला आणि नंतर काही दिवसांचा वेळ मागितला. तर आता

आदिल खानने राखीसोबतच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की, "मी शेवटी एक घोषणा करतो, मी राखीशी लग्न केले नाही असे कधीच म्हटले नाही. फक्त काही गोष्टी शांतपणे हाताळायच्या होत्या. पप्पूडी, हॅप्पी मॅरीड लाईफ" अशी पोस्ट करत आदिलने केली आणि लग्न मान्य केलं. यानंतर राखी आणि आदिलने मीडियासमोर वक्तव्य केलं, ज्यात ड्रामा क्वीन म्हणाली की सलमान खानने तिचं लग्न वाचवलं.

पापाराझींशी बोलताना राखी सावंत म्हणाली, '(सलमान खान)भाऊ त्याच्यावर खूप प्रेम करतो. भाऊही त्याला भेटला आहे. त्याला भाईचा फोन नक्कीच आला आहे. सर्व काही भावानेचं केले आहे. हे तुम्हाला माहीत आहे. भाऊ असल्याने तो बहिणीशी लग्न करण्यास नकार देऊ शकतो का? भावाचा फोन आला म्हणुनच काहीतरी घडलं असेल ना?' यानंतर आदिलही म्हणतो, 'तो खूप चांगला आहे आणि त्याने मला काही गोष्टी समजावून सांगितल्या आहेत.' यावर राखी म्हणते, 'माझ्या भावाने माझे घर सेटल केले आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT