rakhi sawant mother, rakhi sawant mother funeral SAKAL
मनोरंजन

Rakhi Sawant Mother Death: गाणं गाऊन राखीने दिला आईला निरोप, रडून रडून वाईट अवस्था

ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार राखीच्या आईवर अंतिमसंस्कार करण्यात आले

Devendra Jadhav

Rakhi Sawant Mother die: ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेली अभिनेत्री राखी सावंतची आई जया भेडा यांचे शनिवारी २८ जानेवारीला दुःखद निधन झाले. राखी आईच्या निधनानंतर संपूर्णपणे कोसळली आहे. अखेर नुकतंच ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार राखीच्या आईवर अंतिमसंस्कार करण्यात आले. आईला निरोप देताना राखी सतत रडत होती. तिचा नवरा आदिल तिच्यासोबत होता. राखी आणि तिच्या कुटुंबीयांनी आईला निरोप देताना श्रद्धांजली पूर्वक गाणं गाऊन त्यांना निरोप दिला

अभिनेत्री राखी सावंत हीच्या आईचं शनिवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या तीन वर्षांपासून राखीची आई जया भेडा यांना कर्करोग झालेला. पुढे त्यांना ब्रेन ट्यूमरचेही निदान झाले आणि प्रकृती अधिकच खालावली. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. राखीनं स्वतः आपल्या आईचं निधन झाल्याची माहिती दिली आहे.

राखीच्या आईचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं. फराह खान सोबत अनेक कलाकार राखीच्या आईच्या अंतिम दर्शनासाठी आलेले. राखी आईजवळ असून सातत्याने रडत होती. पुढे राखीच्या आईला पेटित ठेवण्यात आलं आणि अंतिम संस्कारांसाठी त्यांना स्मशानभूमीत नेण्यात आलं. शवपेटीवर फुलांची सजावट करण्यात आली. राखी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आईसाठी श्रद्धांजलीपर गाणं गायलं आणि शोकाकुल वातावरणात राखीने तिच्या आईला निरोप दिला

आईच्या निधनानंतर राखी सावंत सातत्याने एकच गोष्ट बोलत होती ते म्हणजे आई शिवाय माझं कुणीच नाही, आई गेली.. आता मी अनाथ झाले. किंबहुना या आधीही राखी अनेकदा हेच म्हणाली आहे, की या जगात आईशिवाय तिचं कुणीच नाही. राखीने सलमान खानचं नाव घेतलं. सलमान आणि बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी राखीला या काळात इमोशनल सपोर्ट केलाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT