Rakhi Sawant Viral News esakal
मनोरंजन

Rakhi Sawant Video : 'तुम्हाला माहिती होतं मला बोलावलं असतं तर मी खुर्च्या तोडून टाकल्या असत्या'!

राखीच्या त्या व्हिडिओवर (Rakhi Sawant Viral Video) नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत...

युगंधर ताजणे

Rakhi Sawant Video: अनंत अन् राधिकाचं प्री वेडिंग झाल्यानंतर आता त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, व्हिडिओ सेलिब्रेटींच्या त्यावरील प्रतिक्रिया चर्चेत आलं आहे. अनेकांनी त्या प्री वेडिंगवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सगळ्यात बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून लोकप्रिय असणाऱ्या राखी सावंतच्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गुजरातमधील जामनगर येथे पार पडलेल्या त्या प्री वेडिंगला थलायवा रजनीकांत यांच्यापासून रणवीर सिंह तसेच जया बच्चन ते जान्हवी कपूर पर्यत अनेक सेलिब्रेटी हजर होते. यावेळी प्रसिद्ध गायिका रिहाना आणि अकॉन यांनी देखील या सोहळ्यामध्ये सादरीकरण करुन उपस्थितांची दाद मिळवली होती.

राखी का नाराज झाली....

बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून राखीचं नाव घेतलं जातं. ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. राखीला वाद घालण्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी कोणतंही कारण पुरतं असंही दिसून आलं आहे. विरल भयानीच्या त्या व्हिडिओमध्ये राखीनं तिला अनंत अन् राधिका अंबानी यांच्या प्री वेडिंगला का बोलावलं नाही यावरुन वाईट वाटल्याचं म्हटलं आहे. तिचा तो व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

राखीच्या त्या व्हिडिओला आतापर्यत लाखो व्ह्युज मिळाले आहे. अनेकांनी राखीच्या त्या व्हिडिओवर तिच्या विरोधातच कमेंट केल्या आहेत. अंबानी तुम्हाला नमस्कार, तुम्ही मला लग्नाला का बोलावलं नाही, तुम्हाला माहिती होतं की, मला जर लग्नाला बोलावलं असतं तर मी फ्लोअर तोडून टाकलं असतं. खुर्च्याही तोडल्या असत्या. माझा डान्स अजुनपर्यत तुम्ही काही पाहिला नाही.

अंबानीजी तुम्ही प्री वेडिंगला अकॉन, रिहाना यांना बोलावलं. हे सगळे माझ्यापुढे कस्पटासमान आहे. तुम्ही माझा डान्स पाहिला नाही का, मुन्नी बदनाम हुई, टुक टुक देखे, परदेसिया ये.. या सगळ्या गाण्यांवर मी डान्स केला आहे. अशा शब्दांत राखीनं तिच्या राग व्यक्त केला आहे.

मी भांडी घासली असती....

एवढेच नाही तर राखीनं पुढे म्हटले आहे की, तुम्ही मला का बोलावले नाही हे सांगा, तुम्ही हजार कोटी रुपये ज्यांना बोलावले, त्यांच्यापेक्षा माझा डान्स चांगलाच आहे. रिहाना तर फाटक्या कपड्यांमध्येच आली. मी जर आले असते तर सगळ्यांनी माझी दखल घेतली असती. मला बोलावलं असतं तुम्हाला फायदाच झाला असता. तो म्हणजे मी तुमचे मनोरंजन केले असते, दुसरीकडे भांडी घासली असती. सगळ्या रुम्स साफ केल्या असत्या.

मी सगळं काही केलं असतं. पण तुम्ही हजार कोटी रुपये खर्च करुन कुणाला बोलावलं, तुम्ही काही राखी सावंतला बोलावलं नाही. हे काय केलं तुम्ही, राखीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे. राखीच्या त्या तक्रारीची नेटकऱ्यांनी देखील नोंद घेत राखीला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT