Rakhi Sawant
Rakhi Sawant Instagram
मनोरंजन

हाच तो राखी सावंतचा नवरा; अखेर फोटो आला समोर

सकाळ डिजिटल टीम

सध्या ‘बिग बॉस १५’ Bigg Boss 15 हा छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये आता तीन वाइल्ड कार्ड एण्ट्री झाल्या आहेत. त्यात रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि ड्रामा क्वीन राखी सावंत Rakhi Sawant यांचा समावेश आहे. राखी सावंतसोबत तिचा पती रितेश देखील ‘बिग बॉस’च्या घरात येणार आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून राखीच्या पतीचा चेहरा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते आणि अखेर रितेश राखीसोबत ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये राखी 'मेरा पिया घर आया' या गाण्यावर थिरकताना दिसते. तर बाकीचे स्पर्धक हे 'जीजाजी' बोलत रितेशचे स्वागत करताना दिसत आहेत. रितेश येताच इतर स्पर्धकांनी त्याला राखी आणि त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारलं. त्यावर रितेशने सांगितलं की, राखीने त्याला २ वर्षांआधी व्हॉट्स अॅपवर ब्लॉक केलं होतं. रितेशने काही वर्षांपूर्वी एक कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा त्याच्या पीएने त्याला राखीचा नंबर दिला आणि त्यानंतर त्याने राखीला फोन केला. त्याने पुढे सांगितले की, "माझ्या खासगी आयुष्यात मी काही समस्यांचा सामना करत होतो. तेव्हा मला काही गोष्टी अशा व्यक्तीशी बोलायच्या होत्या जो माझ्या फिल्डमधला नसेल, म्हणून मी राखीला हाय मेसेज केला होता. पण तिने मला थेट ब्लॉकच केलं."

rakhi sawant

त्यानंतर त्याने तिला दुसऱ्या नंबरवरून मेसेज केला आणि तेव्हा राखीने त्याला रिप्लाय दिला. त्यावर राखी म्हणाली, "त्यावेळी मी पण अस्वस्थ होते. माझा एक बॉयफ्रेंड होता आणि नंतर मला कळलं की तो एक डॉन आहे. त्याच्यावर खूप कर्ज होतं आणि मला माझ्या जीवाला धोका वाटत होता. त्यातून मार्ग काढत रितेशने मला नवी आशा दाखवली."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: भारतात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 10 किलोपर्यंत मोफत रेशन देणार- मल्लिकार्जुन खर्गे

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Vastu Tips: नवीन हॉटेल सुरू करताना कोणते नियम पाळावे, वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

SCROLL FOR NEXT