raksha bandhan : actress dhanashri kadgaonkar shrared feeling about her brother in this rakshabandhan she busy in shooting tu chal pudha serial zee marathi  sakal
मनोरंजन

अभिनेत्री धनश्री काडगावकरला येतेय भावाची आठवण.. म्हणाली, यंदाचं रक्षाबंधन..

रक्षाबंधना निमित्त अभिनेत्री धनश्री काडगावकरने आपल्या भावाविषयीची एक आठवण सांगितली आहे.

नीलेश अडसूळ

raksha bandhan : रक्षाबंधन.. म्हणजे भावा बहिणीतील अनोखे बंधन.. अगदी जिव्हाळ्याचा सण!! या सणाला बहीण भावाला राखी बांधते, भाऊ बहिणीसाठी छानशी भेटवस्तू घेतो. प्रत्येकजन का सण साजरी करतो. मग त्याला कलाकारही अपवाद नाही. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहीण भावांसाठी सर्व कलाकार काहीना काही विशेष करत असतात. कुणी एखादी पोस्ट लिहितो, कुणी फोटो शेयर करतो तर कुणी त्यांच्या घरगुती सोहळ्याचे फोटोहो चाहत्यांसोबत शेयर करत असतात. अशीच एक खास आठवण अभिनेत्री धनश्री काडगावकर (dhanashi kadgaonkar) हिने सांगितली आहे. कारण चित्रीकरणात व्यस्त असल्याने तिला यंदा आपल्या भावाकडे जाणं शक्य नाही.

(raksha bandhan : actress dhanashri kadgaonkar shrared feeling about her brother in this rakshabandhan she busy in shooting tu chal pudha serial zee marathi)

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर बरीच चर्चेत असते. ती सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या भाषेतील गोडवा, कोल्हापुरी लहेजा याचे लाखो लोक दिवाने आहेत. एवढेच नाही तर तीची सडेतोड उत्तर देण्याची पद्धतही सर्वांना चांगलीच ठाऊक आहे. आता ती पुन्हा एकदा मालिका विश्वातून आपल्या भेटीला येत आहेत. झी मराठी वरील 'तू चाल पुढं' या मालिकेत ती मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. याच मालिकेच्या चित्रीकरणात ती प्रचंड व्यस्त आहे. त्यामुळे रक्षाबंधनाला भावाकडे जाण्याची तीची इच्छा पूर्ण होणार नाही. याच विषयी धनश्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री धनश्री काडगावकर लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणाली की, 'आम्ही लहानपणी खुप भांडायचो ,भन्नाट मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेट वस्तू असायची,पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा. अशा खूप मधुर आठवणी आमच्या नात्यात आहेत. या वर्षी कामात व्यस्त असल्यामुळे रक्षाबंधनाला भावाची भेट होईल की नाही शंका आहे पण काहीही करून आम्ही नक्की रक्षाबंधन साजरे करु,'अशा शब्दात आरतीने नात्यातील गोडवा सांगितला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT