Rakul Preet Singh And Jackky Bhagnani esakal
मनोरंजन

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani: रकुल आणि जॅकी यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण; व्हिडीओनं वेधलं अनेकांचे लक्ष

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani: रकुल आणि जॅकी यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रकुल आणि जॅकी यांच्या विवाह सोहळ्यातील खास क्षण दिसत आहे.

priyanka kulkarni

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani: अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) यांचा विवाह सोहळा 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात पार पडला.अनेक कलाकारांनी जॅकी आणि रकुल यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. अशातच आता रकुल आणि जॅकी यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रकुल आणि जॅकी यांच्या विवाह सोहळ्यातील खास क्षण दिसत आहे.

रकुल आणि जॅकी यांच्या विवाह सोहळ्याचे खास क्षण

रकुल आणि जॅकी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते दोघे सातफेरे घेताना दिसत आहेत. तसेच रकुल आणि जॅकी हे या व्हिडीओमध्ये डान्स करताना देखील दिसत आहेत. अशताच या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "It’s not you or me , it’s US". रकुल आणि जॅकी यांच्या हळद, संगीत आणि मेहंदी सोहळ्याची झलक देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत. रकुल आणि जॅकी यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:

रकुल आणि जॅकी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'बिन तेरे' हे गाणं ऐकू येतं.

रकुल आणि जॅकी यांचा खास लूक

रकुल प्रीत सिंहने तरुण ताहिलियानीचा डिझायनर लेहेंगा लग्न सोहळ्यात परिधान केला होता, तर जॅकीनं गोल्डन आणि क्रीम कलरची शेरवानी परिधान केला होता. रकुलने कुंदन ब्राइडल ज्वेलरी देखील परिधान केली होती. दोघांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT