Rakul Jackky Wedding In Goa esakal
मनोरंजन

Rakul-Jackky Wedding : एकदा नव्हे तर दोनवेळा करणार लग्न? पाहुण्यांसाठी खास 'नियमावली'!

आज गोव्यामधील एका अलिशान हॉटेलमध्ये रकूल अन् जॅकीचा शाहीविवाह (Rakul-Jackky Wedding) सोहळा पार पडणार आहे.

युगंधर ताजणे

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding: ज्या लग्नाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे त्या जॅकी अन् रकुलचं लग्न आज गोव्यातील एका रॉयल हॉटेलमध्ये पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या (Latest entertainment news) लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु होती. सुरुवातीला भारताबाहेर जाऊन लग्न करण्याचा निर्णय़ घेणाऱ्या रकूल अन् जॅकीनं जाणीवपूर्वक भारतातच वेडिंग प्लॅन करण्यास प्राधान्य दिले होते.

रकूल अन जॅकीच्या शाहीविवाह सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार (Rakul jackky Wedding Goa) चर्चा आहे. त्या लग्नातील शाही मेजवानीची, पाहुण्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या नियमावलींची, दोन वेगवेगळ्या प्रकारे पार पडणाऱ्या विवाहसमारंभाची, इको फ्रेंडली विवाह सोहळ्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास रकूल आणि जॅकी हे विवाहबद्ध होणार (Latest News Of Rakul Jackky Wedding) असून त्यांच्या लग्नाला विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. प्री वेडिंगचे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्य विवाहसोहळ्याला सुरुवात होणार आहे. लग्नानंतर येत्या काही दिवसांत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन असल्याचेही चर्चा आहे.

दोनदा लग्न करणार?

हिंदूस्थान टाईम्सनं दिलेल्या एका बातमीनुसार हे जोडपं पहिल्यांदा पंजाबी आणि त्यानंतर सिंधी रितीरिवाजानुसार विवाह करणार आहेत. आनंद कारज नुसार त्यांचे लग्न होईल. जॅकी हा सिंधी कुटूंबातील असून त्याच्या परंपरेप्रमाणे लग्न होणार असल्याची माहिती आहे. या लग्नाला जवळचे नातेवाईक अन् मित्र परिवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.तसेच बॉलीवूडमधील निवडक सेलिब्रेटींना निमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्नातही नियम व अटी लागू....

रकूल आणि जॅकीनं लग्नाला जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या नियम व अटी लागू केल्या आहेत. आलेल्या पाहुण्यांनी मोबाईलचा वापर करण्याची परवानगी नाही. त्यांनी फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा नाही. प्रायव्हसी जपण्यासाठी शक्य तेवढी काळजी या निमित्तानं घेतली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

लग्नाला येणाऱ्या पाहुण्या मंडळींचे फोन हे सुरक्षारक्षकाकडून घेतले जाणार आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत लग्नस्थळी फोन वापरता येणार नाही याची काळजी दोन्ही सेलिब्रेटींनी घेतली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून रकुल आणि जॅकीच्या लग्नाची तयारी सुरु असून आज ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

SCROLL FOR NEXT