मनोरंजन

रकुल प्रीत, राणा दग्गुबातीला ड्रग्ज प्रकरणी ED कडून समन्स

विनायक होगाडे

सक्तवसूली संचलनालयाने म्हणजे ईडीने चार वर्षे जुन्या असलेल्या एका ड्रग्ज प्रकरणामध्ये टॉलीवूडच्या टॉप एक्टर्स आणि डायरेक्टर्सना समन्स जारी केला आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रवि तेजा आणि पुरी जगन्नाथ यांचा समावेश आहे. हे सगळे साऊथ सिनेमाचे लोकप्रिय चेहरे आहेत. या सगळ्यांना एकावेळीच समन्स पाठवण्यात आले आहेत. रकुल प्रीत सिंहला ६ सप्टेंबर, राणा दग्गुबातीला ८ सप्टेंबर, रवि तेजाला ९ सप्टेंबर आणि पुरी जगन्नाथला ३१ सप्टेंबरला ईडीने बोलावलं आहे. या चार वर्षे जुन्या असलेल्या ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 12 लोकांना समन्स पाठवण्यात आले आहेत.

हे प्रकरण तेलंगाणाच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित आहे. या विभागाद्वारे जुलै २०१७ साली एका फेमस बारमध्ये तपासानंतर दाखल करण्यात आलेल्या १२ खटल्यांवर आधारित आहे. या प्रकरणी ११ चार्जशीट दाखल करण्यात आल्या होत्या. रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबती, रवी तेजा किंवा पुरी जगन्नाथ यांची नावे आरोपी म्हणून नाहीयेत. मात्र, ते मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये सामील आहेत की नाही हे आताच सांगणं थोडं घाईचं ठरेल, असं एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलंय.

2017 मध्ये तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख किमतीचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर 12 गुन्हे दाखल केले होते. 11 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी, आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे आणि 62 जणांची तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने ड्रग्ज प्रकरणी चौकशी केली आहे. यातील ज्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्यातील अकरा जण फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

घटस्फोट पाहिले, नाती तुटताना पाहिली... लग्नाआधीच ऋषी सक्सेनासोबत लिव्ह-इनमध्ये का राहते ईशा केसकर? स्वतः सांगितलं कारण

MPSC Exam Update: एमपीएससी ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना; अधिकृत निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT