ram charan Sakal
मनोरंजन

Ram Charan: राम चरणने नाकारला होता सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक कारण...

राम चरणला मगधीराचा हिंदी रिमेक ऑफर करण्यात आला होता पण त्याने नकार दिला. या मागचे कारण माहित आहे का?

सकाळ डिजिटल टीम

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राम चरण जगभर प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आजकाल राम चरणचे अनेक चित्रपट आहेत, जे एकामागून एक चित्रपटगृहात दाखल होतील. फार कमी लोकांना माहित आहे की काही काळापूर्वी राम चरण यांना बॉलिवूड चित्रपटाची ऑफर आली होती पण त्यांनी नकार दिला होता.

2009 साली प्रदर्शित झालेला राम चरणचा मगधीरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा सिनेमा एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या यशानंतर अनेक बॉलिवूड निर्माते राम चरणला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विचार करत होते. त्याला 'मगधीरा'च्या हिंदी रिमेकची ऑफरही आली होती, पण त्याने ती नाकारली.

'मगधीरा' पाहिल्यानंतर अनिल कपूर राम चरणवर खूप प्रभावित झाले आणि त्यांनी अभिनेत्यासोबत हिंदी रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

खुद्द राम चरण यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ही माहिती दिली. तो म्हणाला, 'काही वेळापूर्वी मी अनिल कपूरला भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी बोनी कपूरला मगधीराचा हिंदी रिमेक तुझ्यासोबत बनवायला सांगेन, पण मी म्हणालो की मला रिमेक करायचा आहे की नाही हे मला माहीत नाही? मगधीरा हा अतिशय सुंदर चित्रपट आहे, जो पुन्हा बनवता येणार नाही.'

काजल अग्रवालने राम चरणच्या काल्पनिक-ड्रामा चित्रपट मगधीरामध्येही काम केले होते. यात अभिनेत्याने दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा राम चरणच्या पात्राच्या पुनर्जन्माभोवती फिरते. त्याच वेळी देव गिल, श्रीहरी, राव रमेश आणि चिरंजीवी देखील या चित्रपटाचा भाग होते.

'RRR'च्या यशानंतर राम चरण आता 'गेम चेंजर' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये त्याची जोडी कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. एस शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय राम चरणकडे 'RC16' देखील आहे. अभिनेत्याच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT