Ram Charan’s Wife Upasana’s Decision To Not Have Kids Hailed By Sadhguru Google
मनोरंजन

'RRR' सुपरस्टार रामचरणच्या पत्नीचा आई न होण्याचा निर्णय, कारणही केलं स्पष्ट

साउथ सुपरस्टार रामचरण आणि उपासना कामिनेनी यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत.

प्रणाली मोरे

साउथ सिनेमाचा स्टार रामचरण(Ram Charan) याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामध्ये महिला चाहता वर्ग जास्त आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण रामचरणने दहा वर्षांपूर्वी जेव्हा उपासना कामिनेनी(Upasana Kamineni) सोबत लग्न केलं तेव्हा या सगळ्या महिला चाहता वर्गाचं मन खट्टू झालं होतं. रामचरण आणि उपासना १० वर्षांनतंरही एकमेकांसोबत आनंदानं वैवाहीक आयुष्य जगत आहेत. त्यांनी आयुष्यात पैसा,नाव खूप कमावलं आहे. पण त्यांचे चाहते मात्र वाट पाहतायत की रामचरण आणि उपासना आई-वडील कधी बनणार? गूड न्यूज कधी देणार? पण आता उपासनानं स्पष्ट केलं आहे की तिला आता मुलं नको आहेत. तिनं याचं कारणही सांगितलं.(Ram Charan’s Wife Upasana’s Decision To Not Have Kids Hailed By Sadhguru)

रामचरणची पत्नी उपासना काही दिवसांपूर्वीच एका सदगुरुंकडे गेली होती. तिथे तिने सांगितले की,''देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी मला मुलं नको आहेत. ती म्हणाली की,लोक माझ्या नात्यावर,आई बनण्यावर आणि एकंदरीत आयुष्यावरनं खूप प्रश्नांची झोड उठवत आहेत. त्यावर त्या सदगुरुंनी उपासनाला सांगितलं की,''पुरुष नेहमीच आपला वंश वाढावा म्हणून चिंतेत असतात. पण यावर जर कंट्रोल आणला तर ग्लोबल वॉर्मिंगची चिंताच करावी लागणार नाही. त्या महिलांना पाहून मला आनंद होतो की ज्यांना मुलांना जन्म द्यायचा नाही''.

रामचरणच्या पत्नीनं सांगितलं की ती त्या सदगुरुंची भेट आपली आई आणि सासू या दोघींशी लवकरच करुन देईल. रामचरणने देखील आपल्या एका मुलाखतीत याआधी स्पष्ट केलं होतं की, त्याला आणि त्याच्या पत्नीला देखील मुलं नको हवी आहेत. रामचरण म्हणाला होता की,''मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा होण्याच्या नाते माझं कर्तव्य आहे की मी माझ्या चाहत्यांना खूश ठेवावं. जर आम्ही कुटुंबाचं प्लॅनिंग करु तर आम्ही आमच्या मिशन वरनं भटकू शकतो. राम चरण म्हणाला होता की माझी पत्नी उपासनाची काही लक्ष्य आहेत. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून ठरवलं आहे अजून काही वर्ष आम्हाला मुलं नको हवी आहेत''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT