Ram Gopal Varma esakal
मनोरंजन

Ram Gopal Varma: रामभाऊ अभिनेत्रीचे पाय चाटायचेच बाकी राहिले! किसिंग करत सुटले

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे चर्चेत राहण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही.

सकाळ डिजिटल टीम

Ram Gopal Varma Dangerous: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे चर्चेत राहण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. आता तर त्यांनी आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हाईट केली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामुळे वर्मा हे चर्चेत आले आहे. अनेकांनी त्यांना आपली मर्यादा ओलांडल्याचे म्हटले आहे.

परखड वक्तव्य, आक्रमक भूमिका यामुळे राम गोपाल वर्मा हे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या बोलण्यामुळे कुणाला काय वाटेल याची चिंता न करता आपल्याला काय चूकीचे आणि काय योग्य वाटते याचा विचार करुन भूमिका मांडणारे सेलिब्रेटी म्हणून राम गोपाल वर्मा ओळखले जातात. मात्र आता सोशल मीडियावर आपल्याच एका चित्रपटाचे फोटो पोस्ट करताना त्यांनी मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते ट्रोल होताना दिसत आहे.

बॉलीवूडच्या सर्वोत्तम दिग्दर्शकांमध्ये राम गोपाल यांचे नाव घेतले जाते. आपली चर्चा व्हावी यासाठी ते काहीही करु शकतात हे त्यांनीच त्यांच्या एका पोस्टमधून दाखवून दिले आहे. त्यांचा डेंजरस नावाचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ते त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनेक निर्माते, दिग्दर्शक प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. मात्र राम गोपाल वर्मा यांनी त्याबाबत मर्यादा ओलांडली आहे.

व्हायरल झालेल्या त्या पोस्टमध्ये वर्मा हे त्यांच्या चित्रपटातील अभिनेत्रीच्या पायाला किस करताना दिसत आहे. त्यात त्यांनी अश्लील कृत्यं करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली आहे. याशिवाय अनेकांनी वर्मा यांनी आपली मर्यादा ओलांडल्याचे म्हटले आहे. त्यांची ती पोस्ट वेगानं व्हायरल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT