Ram Gopal Varma On Animal Movie Every Film School :  esakal
मनोरंजन

Animal Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' वर बोलताना राम गोपाल वर्मांची जीभ घसरली! आता म्हणाले, 'प्रत्येक...'

आता पुन्हा एकदा राम गोपाल वर्मा यांनी एक पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी केलेल्या सुचना नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Ram Gopal Varma On Animal Movie Every Film School : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत. सध्या त्यांनी सोशल मीडियावर चर्चेतल्या अॅनिमल चित्रपटाविषयी शेयर केलेली पोस्ट ही तुफान चर्चेत आली आहे.

यापूर्वी देखील राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये अॅनिमलचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि रणबीरचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, मी जेव्हा अॅनिमल पाहिला तेव्हा खूपच प्रभावित झालो आहे. तो चित्रपट पाहून मला दिग्दर्शक आणि रणबीर यांच्या पाया पडावेसे वाटते. त्यानंतर वर्मा यांच्या पोस्टनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

आता पुन्हा एकदा राम गोपाल वर्मा यांनी एक पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी केलेल्या सुचना नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ते म्हणतात, १० डिसेंबर २०२३ नंतर आता भारतीय चित्रपटांचा चेहरा पूर्णपणे बदलून गेला आहे. प्रेक्षकांना नेमकं काय चित्रपटामध्ये काय आवडलं हे कुणालाही सांगता येत नाहीये. मला असे वाटते की आता सगळ्या फिल्म स्कुलमधील पाठ्यक्रम बदलण्याची गरज आहे.

फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अॅनिमल सारखा चित्रपट कसा तयार करायचा हे सांगण्याची गरज आहे. चांगलं-वाईट, नैतिकता, निष्ठा सारखी मुल्यं शिकण्याची गरज या चित्रपटाच्या माध्यमातून आहे. असेही राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे.

संदीप रेड्डी वांगानं अॅनिमलचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी त्यांनी अर्जुन रेड्डी, कबीर सिंग सारखे चित्रपट प्रदर्शित केले होते. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. अॅनिमलनं मात्र रेड्डी वांगाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये रणबीर हा मुख्य भूमिकेत असून रश्मिका मंदाना, अनिल कपूर, शक्ती कपूर, तृप्ती डिमरी, बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत.

आता पर्यत या चित्रपटानं तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून वर्ल्ड वाईड त्याचे कलेक्शन चारशे कोटींच्या पुढे गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रणबीरनं त्याच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केल्याचे यानिमित्तानं सांगितले जात आहे. रणबीरच्या करिअरमधला आजवरचा सर्वाधिक चर्चिला गेलेला चित्रपट म्हणूनही अॅनिमलचे नाव घेतले जात आहे.

एक डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या अॅनिमलची निर्मिती ही भुषण कुमार आणि कृष्ण कुमार तसेच मुराद खेतानी, प्रणय रेड्डी वांगा यांनी भद्रकाली पिक्चर्स द्वारा अॅनिमल ची निर्मिती केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची तुफान लोकप्रियता मिळवताना दिसतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT