Ram Gopal Varma on the language controversy between Ajay Devgn and Sudeep... Google
मनोरंजन

'साऊथ स्टार्सवर बॉलीवूडकर जळतात'; राम गोपाल वर्माची 'अजय-किच्चा' वादात उडी

साऊथ अभिनेता किच्चा सुदीपच्या एका ट्वीटवरनं सुरु झालेल्या मुद्दयाला आता वादाचा रंग चंढला आहे.

प्रणाली मोरे

अजय देवगण(Ajay Devgan) आणि किच्चा सुदीप(Kiccha Sudip) यांच्यात सोशल मीडियावर हिंदी भाषेवरुन चांगलाच वाद रंगला. कन्नड अभिनेता किच्चा सुदीप याच्या एका ट्वीटमुळे पूर्ण साऊथ आणि बॉलीवूड इंडस्ट्री दरम्यान आता चक्क भांडणं सुरु झालेली दिसून येत आहेत. याच भांडणाला आणखी विस्तव देण्याचं काम केलं आहे ते बॉलीवूडच्या दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं. राम गोपाल वर्मानं आपली प्रतिक्रिया नोंदवताना साऊथ अभिनेता किच्चा सुदीपचं समर्थन करीत अजय देवगणला फटकारलं आहे.

Ram Gopal Verma Post

किच्चा सुदिपची प्रशंसा करताना अजय देवगणच्या वक्तव्यावर प्रश्न निर्माण करीत राम गोपाल वर्मानं लिहिलं आहे,''हा मुद्दा समजवण्यासाठी तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. काय झालं असतं जर अजय देवगणच्या हिंदी ट्वीटचं उत्तर तू कन्नड भाषेत दिलं असतंस. माझं तुला पूर्ण समर्थन आहे. आता प्रत्येकाला कळेल की नॉर्थ-साऊथ असं काही नसतं,संपूर्ण भारत एक आहे''.

Ram Gopal Verma Post

यानंतर अजय देवगणच्या ट्वीटचं उत्तर लिहिताना राम गोपाल वर्मानं लिहिलं आहे,''अजय जे बोलत आहे त्यावर माझा विश्वास आहे. मी त्याला खूप वर्षांपासून ओळखतो. मला माहित आहे,त्याच्या बोलण्याचा लोकांनी वेगळा अर्थ काढला आहे. भाषा या राज्य आणि संस्कृतीच्या पल्याड जाऊन विकसित झालेल्या आहेत. त्या नेहमीच दोन विविध राज्यांना जोडायचं काम करतात''.

तसंच,राम गोपाल वर्मानं किच्चा सुदीपच्या हिंदी भाषा राष्ट्रभाषा नाही या ट्वीटचं समर्थन केलं आहे. किच्चानं खूप महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे असं राम गोपाल वर्माचं म्हणणं आहे. राम गोपाल वर्माचं म्हणणं आहे की,'' बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्री मध्ये युद्धाचं वातावरण निर्माण झालं आहे''. राम गोपाल वर्मानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,''बॉलीवूड स्टार्सच्या मनात साऊथ स्टार्सविषयी असुरक्षित भावना आहे. कारण कन्नड सिनेमा KGFने आपल्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ५० करोड कमावले. आता बॉलीवूडचे सिनेमा ओपनिंग डे ला कशी बॅटिंग करतात ते जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे''. एवढचं नाही राम गोपाल वर्मानं अजय देवगणच्या Runway 34 ला देखील आव्हान दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शहांचा निरोप चंद्रकांत दादांनी मोहोळना दिला, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; शिंदेंना शब्द दिल्यानं धंगेकर गप्प, काय घडलं?

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये, कधी जाणून घ्या?

Solapur News: आकडे पाहून सगळेच म्हणाले, आँ एवढा पाऊस कधी झाला?; मदतीसाठी बहाद्दरांनी पाडला १९९ मि.मी. पाऊस..

Solapur Accident: 'पाच कार एकमेकांवर आदळून विचित्र अपघात'; गर्भवती महिला जखमी; सोलापूर पुणे महामार्गावर घटना..

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT