Vivek Agnihotri- The Kashmir Files
Vivek Agnihotri- The Kashmir Files Google
मनोरंजन

I Hate Kashmir Files म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला विवेक अग्निहोत्री म्हणाले...

प्रणाली मोरे

सध्या संपू्र्ण देशात विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir FIles) या सिनेमावरनं दोन गट पडलेले दिसत आहेत. कुणी सिनेमाच्या समर्थनार्थ भाष्य करताना दिसत आहे तर कुणी सिनेमाच्या विरोधात आवाज उठवताना दिसत आहे. कारण सिनेमाच्या कथानकानं देशातील एका महत्त्वाच्या विषयासंदर्भात दडून राहिलेल्या सत्याला समोर आणलं आहे. हा सिनेमा भाष्य करतो काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर आणि काश्मिरमधून त्यांना करायला लागलेल्या पलायनवादावर. या सिनेमानं बॉक्सऑफिसवर १०० करोडपेक्षा अधिक कमाई केल्याचं बोललं जात आहे. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद सिनेमाला मिळत आहे. पण असं असतानाही दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं सिनेमासंदर्भात एक प्रतिक्रिया दिली ,ज्यामुळे लोकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. पण आता The Kashmir Files सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मात्र राम गोपाल वर्माला जे प्रतिउत्तर केलं आहे त्यानं लोकांचं मन जिकंलं आहे.

'द काश्मिर फाईल्स' सिनेमाच्या प्रदर्शनानंतर १० दिवसांनी राम गोपाल वर्मा(Ram Gopal Verma) यांनी या सिनेमासंदर्भात आपलं मत मांडणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहेे. राम गोपाल वर्मांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलवर ''आय हेट काश्मिर फाईल्स' हे टायटल देत हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ इथे बातमीत आम्ही जोडलेला आहे. तो नक्की पहा.

या व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा म्हणालेयत,''सिनेइंडस्ट्रीतील माझ्या संपू्र्ण करिअरमध्ये मी पहिल्यांदाच एखाद्या सिनेमाचा रिव्ह्यू करीत आहे. मी कधीच सिनेमाच्या विषयाचा आणि त्यातील कॉन्ट्रोव्हर्सीचा रिव्ह्यू करत नाही,मी एक दिग्दर्शक म्हणून सिनेमाचा रिव्ह्यू करेन. हा सिनेमा कसा बनवलाय याविषयी बोलेन''. यानंतर राम गोपाल वर्मांनी मनापासून सिनेमाचं कौतूक केलं. सिनेमातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचेही कौतूक केले. या व्हिडीओला शेअर केल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर आपल्या पोस्टला कॅप्शन देताना लिहिलं आहे ते खरंतर खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी थेट बॉलीवूडवर आरोप करत म्हटलं आहे,''द काश्मिर फाईल्सला मिळालेल्या भरघोस यशावर बॉलीवूड,टॉलीवूडशी संबंधित मोठा गट दु्र्लक्ष करीत आहे असं वाटतंय. बॉलीवूड घाबरलंय. दर्शकांनी अशा प्रकारच्या सिनेमाला दिलेला प्रतिसाद त्यांनी गांभीर्यानं घेतला आहे. मी काश्मिर फाईल्सचा तिरस्कार करतो.मी आजपर्यंत जे शिकलो,जे समजलं या सगळ्याला त्या सिनेमानं एका क्षणात खोटं ठरवलं''.

आता या राम गोपाल वर्मांच्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाच्या व्हि़ीडीओ आणि टायटलवर सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''तुम्ही काश्मिर फाईल्सचा तिरस्कार करता म्हणूनच मी तुमच्यावर प्रेम करतो आहे''. 'द काश्मिर फाईल्स' सिनेमा ११ मार्च २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमानं जवळजवळ १५० करोडची कमाई केली आहे. या सिनेमात अनुपम खेर,पल्लवी जोशी,चिन्मय मांडलेकर,दर्शन कुमार,मिथुन चक्रवर्ती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; जाणून घ्या बेंगळुरू-चेन्नईची प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT