Ram Lalla Pran Pratishtha Esakal
मनोरंजन

Ram Lalla Pran Pratishtha: बॉलीवूडमधील कोणत्या सेलिब्रेटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नाहीच!

Ram Lalla Pran Pratishtha: अयोध्येत आज राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड स्टार्स कालपासूनच अयोध्येला रवाना झाले आहेत. पण, यामध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांना निमंत्रण मिळालेले नाही.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज अयोध्देत श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरातील दिग्गज नेते, अभिनेते , अभिनेत्री, दिग्दर्शक यांच्यासह अनेकांना निमंत्रित करण्यात आलं आहे. तर, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक बडे लोक येत आहेत तर काही आधीच पोहोचले आहेत. राजकारण्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत सर्वजण आज राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.

पण असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नाही. शाहरुख खानपासून ते दीपिका पदुकोणपर्यंत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.

अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफसह अनेक कलाकार अयोध्येला पोहोचले आहेत. काही स्टार्स काल तर काही आज २१ जानेवारीलाच तिथे पोहोचले आहेत. या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.

शाहरुख खान

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खानला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. हे निमंत्रण न पाठवण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सलमान खान

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सलमान खान देखील सहभागी होऊ शकणार नाही. त्यालाही निमंत्रित करण्यात आलेले नाही. सलमान खानशिवाय आमिर खानलाही निमंत्रित करण्यात आलेले नाही.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

बॉलीवूडचे सर्वात रोमँटिक कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. दीपिका-रणवीरसोबत सैफ अली खान आणि करीना कपूरही यात सहभागी होणार नाहीत.

कंगनाने हनुमान गढी येथे केली स्वच्छता

कंगना रणौत काल (रविवारी) 21 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचली होती. त्यावेळी तिने अयोध्येतील हनुमान गढी येथे स्वच्छता केली. कंगनाचा स्वच्छता करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT