मनोरंजन

Ram Mandir Pran Pratishtha : रामचरणलाही मिळालं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण!

बॉलीवूड आणि साऊथमधील अनेक सेलिब्रेटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

युगंधर ताजणे

Ram Charan and his wife Upasana Konidela invited for Ram Mandir : बॉलीवूड आणि साऊथमधील अनेक सेलिब्रेटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास बिग बी अमिताभ बच्चन आणि थलायवा रजनीकांत यांचे नाव घ्यावे लागेल. आता आणखी एका प्रसिद्ध सेलिब्रेटीला निमंत्रण देण्यात आले आहे.

आतापर्यत आलिया भट्ट,रणबीर कपूर, रणदीप हुड्डा, धनुष यांच्यासहित रामचरण-उपासना यांना राम मंदिराच्या उद्घघाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर हे रामचरणच्या हैद्राबादमध्ये असणाऱ्या निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी त्याला निमंत्रण दिल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर रामचरण आणि त्याच्या कुटूंबियांचे फोटो व्हायरल झाले आहेत. रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिल्याचे त्या फोटोमधून दिसत आहे. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

अयोध्येमध्ये १४ ते २२ जानेवारी दरम्यान अमृत महोत्सवाचे आयोजन केले आहे. २२ तारखेला संबंध देशभरामध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा केला जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जानेवारी रोजी देशभरातून तब्बल एक लाख भाविक या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

रामचरणच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो राजामौली यांच्या आऱआरआरमध्ये दिसला होता. त्यामध्ये त्यानं ज्युनिअऱ एनटीआरच्या सोबत प्रमुख भूमिका साकारली होती. त्याचीही जोरदार चर्चा झाली होती. त्यात अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी देखील भूमिका साकारल्या होत्या. रामचरणचा येत्या काळात गेमचेंजर नावाचा चित्रपट येतो आहे. त्यात त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. त्यात रामचरणं आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT