ram setu team 
मनोरंजन

अक्षय कुमारनंतर 'रामसेतू'च्या सेटवरील ४५ ज्युनिअर आर्टिस्ट कोरोना पॉझिटिव्ह

स्वाती वेमूल

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'रामसेतू' या चित्रपटाच्या सेटवरील ४५ ज्युनिअर आर्टिस्टना कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून रविवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने याबाबतची माहिती दिली होती. मुंबईतील मड आयलँड याठिकाणी आज (१५ एप्रिल) १०० लोकांची एक टीम 'रामसेतू'च्या सेटवर पोहोचणार होती. त्यापूर्वी अक्षय आणि इतर आर्टिस्टची कोरोना चाचणी करण्यात यावी असा निर्णय निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी घेतला होता. त्यानंतर या १०० लोकांपैकी ४५ लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

"रामसेतू चित्रपटाची टीम सर्व प्रकारची काळजी घेत आहे. ज्या ४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे", अशी माहिती 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्पॉइज'चे (FWICE) सचिव अशोक दुबे यांनी दिली. या चित्रपटाची शूटिंग सध्या थांबवण्यात आली आहे. जवळपास १३-१४ दिवसांनंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. 

अक्षय कुमारला कोरोना
अक्षयने रविवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याला कोरोना झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. 'माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर मी लगेचच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं. सध्या मी घरीच क्वारंटाइनमध्ये राहत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व नियम पाळत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया चाचणी करून घ्यावी', अशी पोस्ट त्याने लिहिली होती. 

राज्यात अंशत: लॉकडाउन
जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शनिवार आणि रविवारी संचारबंदी, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी, असे विविध निर्बंध लागू करीत राज्य सरकारने राज्यात अंशत: लॉकडाउनच लागू केली. मात्र रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसून, वृत्तपत्र वितरणासही मुभा देण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT