Ramanand Sagar's son prem sagar criticizes Adipurush movie prabhas kriti sanon saif ali khan  SAKAL
मनोरंजन

Adipurush Ramanand Sagar: रावणात लाख चुका पण टपोरी नाही... रामानंद सागरच्या मुलाची आदिपुरुषवर जहरी टीका

अशातच रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागरने आदिपुरुष सिनेमावर जहरी टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adipurush criticizes by Ramanand Sagar Son: आदिपुरुष सिनेमा रिलीज झालाय खरा पण सिनेमावर चहूबाजूंनी सडकून टीका होतेय. प्रेक्षक सिनेमाचा खरपूस समाचार घेत आहेत शिवाय दिग्गज सेलिब्रिटी सुद्धा सिनेमावर जहरी टीका करत आहेत.

अनेक जण रामानंद सागर यांची मालिका रामायण आणि आदिपुरुष सिनेमाची तुलना करता आहेत. अशातच रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागरने आदिपुरुष सिनेमावर जहरी टीका केली आहे.

(Ramanand Sagar's son prem sagar criticizes Adipurush movie prabhas kriti sanon saif ali khan)

देवदत्त नागे यांनी हनुमानाच्या रूपात बोललेल्या 'तेल तेरे बाप का, जलेगी तेरे बाप की' या संवादाबद्दल प्रेम सागर यांना जेव्हा सांगण्यात आले, तेव्हा ते हसले

आणि सिनेमात संपूर्ण टपोरी शैली वापरलीय असं सांगितलं. ओम राऊत यांनी आदिपुरुष नव्हे तर मार्व्हल सिनेमा बनवायचा प्रयत्न केलाय असं प्रेम सागर म्हणाले.

रावण खलनायक नव्हता

प्रेम सागर म्हणाले की, त्यांचे वडील रामानंद सागर यांनीही 'रामायण' बनवताना सर्जनशील स्वातंत्र्याचा वापर केला, परंतु त्यांना भगवान राम समजले.

अनेक ग्रंथ वाचून त्यांनी त्यात किरकोळ बदल केले पण वस्तुस्थितीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. रावण हा खूप अभ्यासू आणि ज्ञानी व्यक्ती होता आणि त्याला खलनायक म्हणून लोकांना दाखवू शकत नाही.

धर्मग्रंथानुसार, रावणाने इतका विनाश केला कारण त्याला माहित होते की केवळ भगवान रामाच्या हातूनच मोक्ष मिळू शकतो.

कुलाबा मधील लोकांना दाखवा आदिपुरुष

प्रेम सागर पुढे म्हणाले की, "धर्मग्रंथात असेही लिहिले आहे की भगवान राम स्वतः रावणाला महान विद्वान मानत होते.

जेव्हा रावण मरणार होता तेव्हा रामाने आपला धाकटा भाऊ लक्ष्मणाला रावणाच्या चरणी जाऊन त्याच्याकडून शिकायला पाठवले. सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही रावणाला भयंकर खलनायक म्हणून चित्रित करू शकत नाही.

आदिपुरुष हे आजच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून बनवले आहे, असे प्रेम सागर यांना सांगितल्यावर ते म्हणाले, 'आजचे रामायण तुम्ही बनवले असेल तर ब्रीच कँडी आणि कुलाबा येथे दाखवा, जगभर दाखवू नका आणि लोकांच्या भावना दुखावू नका.

एकूणच बाबांच्या रामायण मालिकेचा दाखल देत प्रेम सागर यांनी आदिपुरुष सिनेमावर जहरी टीका केलीय. आदिपुरुष सिनेमा १६ जूनला जगभरात प्रदर्शित झालाय.

एकाच दिवसात आदिपुरुषने १५० कोटी रुपयांचा गल्ला जमावलाय. सिनेमावर सडकून टीका होत असली तरीही प्रेक्षक सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT