Ramayan fame Dipika Chikhlia expresses gratitude to PM Modi visits Ayodhya's Ram Mandir SAKAL
मनोरंजन

PM Modi : मोदींनी सनातन धर्मासाठी.. रामलल्लाचे दर्शन घेतल्यावर दीपीका चिखलीयांनी केलं पंतप्रधानांचं कौतुक

दीपिका यांनी मिडीयाशी बोलताना पंकप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.

Devendra Jadhav

Dipika Chilkhliya Gratitude to PM Modi: ओम राऊतच्या आदिपुरुष सिनेमा अनेकांना आवडला नाही. आदिपुरुष वेळी अनेकांना रामायण मालिकेची आठवण आली.

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतुन घराघरात पोहोचलेली सीता म्हणजेच अभिनेत्री दीपिका चिखलिया. दीपिका यांनी नुकतंच अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यावेळी दीपिका यांनी मिडीयाशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.

(Ramayan fame Dipika Chikhlia expresses gratitude to PM)

मोदींनी सनातनींसाठी खुप काही केलंय

ANI शी विशेष संवाद साधताना दीपिका म्हणाली, 'पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सनातनींसाठी खूप काही केले आहे. खरंतर हे खूप आधी व्हायला हवे होते,

परंतु अजुनही उशीर झालेला नाही. याशिवाय भगवान श्रीरामाचे जे अधिपत्य आणि तीर्थस्थान आहे, त्यास महत्त्व दिले पाहिजे. अशा भावना दीपीका यांनी शेअर केल्या.

प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर सांगितला अनुभव

अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतरचा अनुभव सांगताना दीपीका म्हणाल्या, “मी प्रभू रामाच्या चेहऱ्यावर असा दिव्य प्रकाश पाहिला हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे; हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.

मी ते कुठेच पाहिले नाही आणि काल रामाचे दर्शन घेतल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. मला माहित होते की हे भगवान रामाचे जन्मस्थान आहे, म्हणून रामजी येथे उपस्थित आहेत.

हे भव्य मंदिर बांधल्यानंतर मी पुन्हा रामाचे आशीर्वाद घेण्यासाठी येईन. रामलल्ला, दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे दुःख दूर करा. अशी प्रार्थना दीपीका यांनी केली.

दीपीका यांचं वर्कफ्रंट

दीपिका रामायण मालिकेसोबतच राज किरणसोबतचा पहिला चित्रपट 'सुन मेरी लैला' आणि 'रुपी दस करोड', 'घर का चिराग' आणि 'खुदाई' अशा तीन हिंदी चित्रपटांसाठीही ओळखल्या जातात.

याशिवाय त्यांनी विक्रम आणि वेताळ मालिकेतही काम केले. सध्या दीपिका त्यांची नवीन मालिका 'धरतीपुत्र नंदिनी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या मालिकेच्या शुटींगसाठी त्या अयोध्येला पोहोचल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News : सप्तशृंगी देवी यात्रेला सुरुवात,देवीच्या आभूषणांची पूजा

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT