Ramayan Laxman Sunil Lahri  Esakal
मनोरंजन

Ram Mandir inauguration ceremony : राम मंदिराच्या उद्घघाटनापूर्वीच 'लक्ष्मण' भडकला! काय आहे कारण?

सुनील लहिरी यांची प्रतिक्रिया चर्चेत!

Vaishali Patil

Sunil Lahri News: अयोध्या येथील ऐतिहासिक श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या कार्यक्रमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशच या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहे. या सगळ्यात आता येणार्‍या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची जोरदार चर्चा आहे.

यात रामायण फेम अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांच्या नावाचा देखील सामावेश आहे. मात्र या यादित रामायणात लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांचे नाव नसल्याने त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

रामानंद सागर यांच्या लोकप्रिय शो 'रामायण'मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारुन लोकप्रिय झालेले अभिनेते सुनील लहरी यांना अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालं नसल्याचे त्यांनी सांगतिले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील लहरी यांनी सांगितले की, त्यांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणचे निमंत्रण मिळालेले नाही. मात्र यामुळे मी निराश झालो नसल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले की आयोजकांना कदाचित लक्ष्मणचे पात्र आमंत्रित करण्याइतके महत्त्वाचे वाटले नसेल किंवा कदाचित त्यांना वैयक्तिकरित्या ते आवडले नसावे.

ते पुढे म्हणाले, जर एखाद्याने कार्यक्रम आयोजित केला असेल तर त्याने प्रत्येक वेळी कॉल केला पाहिजे असं नाही. इतिहासात नोंद होणार्‍या एका क्षणाचा भाग होण्याची संधी मिळाली असती तर बरं झालं असतं असं त्यांनी यावेळी सांगितलं.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिरानी, ​​अरुण गोविल, संजय लीला भन्साळी, दीपिका चिखलिया, रोहित शेट्टी आणि महावीर जैन यांच्या नावाचा समावेश आहे तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला देखील निमत्रण मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT