Ramayan Star Dipika Chikhlia Shares Video Dressed As Sita, netizens says; No One Can Replace You sakal
मनोरंजन

Adipurush: 'आदिपुरुष'चं थोतांड पाहून 'रामायण' मालिकेतल्या अभिनेत्री पुन्हा आल्या सीता मातेच्या रूपात..

अभिनेत्री दीपिका चिखलिया यांचा व्हिडिओ व्हायरल..

नीलेश अडसूळ

Dipika Chikhlia Reel viral : सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट १६ जून रोजी रिलीज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट टीजर रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

त्यानंतर मध्यंतरी ट्रेलर पाहून परिस्थिती जरा सुधारली आणि लोकांमध्ये पुन्हा आदिपुरुषची क्रेझ निर्माण झाली. पण चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. हिंदू देवी देवतांचे विडंबन केल्याचा ठपका या चित्रपटावर बसला आहे.

या चित्रपटावर प्रचंड टीका होत आहे. चित्रपटातील व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार, हनुमानाचा संवाद सगळ्यावरच लोक सडकून टीका करत आहे.

सोशल मीडियावर तर अक्षरशः लोकांनी चित्रपटाचे, निर्मात्यांचे, दिग्दर्शकाचे वाभाडे काढले आहेत. अशातच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.

(Ramayan Star Dipika Chikhlia Shares Video Dressed As Sita, netizens says; No One Can Replace You)

'आदिपुरुष' चित्रपटावरून वाद पेटलेला असतानाच 'रामायण' या लोकप्रिय मालिकेत 'सीता' मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दीपिका चिखलिया यांनी आदिपुरुष चित्रपटातील राम सिया राम या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केल आहे. या व्हिडीओमध्ये त्या भगवी साडी नेसून सीतेच्या लूकमध्ये दिसत आहेत. आणि अत्यंत तल्लीनतेने ट्या प्रभू रामाची भक्ती करत आहेत.

दीपिका यांच्या या व्हिडीओला प्रचंड पसंती मिळाली असून नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांच्या दीपिका यांचं प्रचंड कौतुक केलं आहे.

'तुम्हीच आहात आमच्या सीतामाता..', 'तुमच्यासारखी सीता मातेची भूमिका कोणीही करु शकत नाही', 'तो चित्रपट पाहण्यापेक्षा हा विडिओ पाहावा' अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

'आदिपुरुष' हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर सध्या सडकून टीका होत आहे. हा चित्रपट नसून थोतांड आहे असंही नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे. या चित्रपटाने तीन दिवसात ३०० कोटीहून अधिकचा गल्ला केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT