Ramayan sunil lahrisays adipurush vfx was difficult to digest  Google
मनोरंजन

Adipurush: VFX पाहून भडकले जुने लक्ष्मण; सुनिल लहरी म्हणाले,'ही तर कार्टुन फिल्म,यापेक्षा..'

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाला आणि सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. मनोरंजन सृष्टीतूनही 'आदिपुरुष'वर टीका केली जात आहे.

प्रणाली मोरे

Adipurush Controversy:ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. काही लोक सैफ अली खानला रावणाच्या लूकमध्ये पाहून खूप सुनावतायत,तर काही लोक सिनेमातील व्हीएफक्स आणि स्पेशल इफेक्ट्सला लाथाडत आहेत. कार्टुन फिल्म पर्यंतची उपमा देऊन लोक मोकळे झालेयत. आता रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध रामायण मालिकेत लक्ष्मणाची भमिका साकारणारे सुनिल लहरी यांनी सिनेमाच्या व्हीएफक्सला चांगलंच फटकारलं आहे.(Ramayan sunil lahrisays adipurush vfx was difficult to digest)

सुनिल म्हणाले की,''त्यांच्या रामायण मालिकेत व्हीएफक्स वगैरे काही वापरण्यात आलं नव्हतं. आजकाल लोकांना मेहनत नाही करायची आहे. आदिपुरुष सिनेमातील व्हीएफक्स तर मनाला पटतच नाहीत. बघताना हसू येतं. आमच्यावेळेस सगळंच तंत्रज्ञान नवीन होतं,पण आम्ही आमच्या मेहनतीने ते कसं चांगलं दिसेल यासाठी प्रयत्न केले होते. आता ३५ वर्षानंतरही लोक आमच्या मालिकेच्या प्रेमात आहेत. आजकालच्या पिढीला देखील आमची मालिका आवडते. त्याच्यातले इफेक्ट्स कार्टुन फिल्मसारखे नाही वाटत''.

सुनिल पुढे म्हणाले,''आमच्या काळात जर आतासारखं प्रगत तंत्रज्ञान असतं तर रामानंद सागर यांनी आणखी खूप चांगल्या पद्धतीनं मालिका बनवली असती. म्हणूनच मला वाटतं की आम्ही जे केलं होतं ते चांगलच केलं होतं. पुन्हा तशा पद्धतीची मालिका बनवणं कठीणच आहे. आमच्या काळात मशिनकडून काम करुनघेतलं तरी माणसं देखील त्या कामावर मेहनत घ्यायचे. आजकाल सगळं तंत्रज्ञानावरच आधारित. कोणाला मेहनत नाही करायची आहे. आम्ही ग्रीन किंवा ब्ल्यू स्क्रीनचा तेव्हा वापर करायचो. त्यानंतर बारकाईनं सगळ्या गोष्टी पाहिल्या जायच्या. राम आणि लक्ष्मण यांना आपल्या खांद्यावर बसवून हनुमानानं केलेला उड्डाणाचा प्रवास दाखवायला आम्हाला ४ दिवस तो सीन शूट करावा लागला लागला होता. तेव्हा आम्ही खूप छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवायचो''.

१९८७ साली दूरदर्शनवर प्रसारीत होणाऱ्या रामायण या मालिकेत अरुण गोविल यांनी राम, दीपिका चिखलिया यांनी सीता आणि सुनिल लहरी यांनी लक्ष्मणाची व्यक्तिरेखा साकारली होती. आदिपुरुषमध्ये प्रभासनं राम,कृति सनननं सीता आणि सनी सिंगने लक्ष्मण ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमा १२ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे, तेलुगु, तामिळ,मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत खळबळ! मध्यप्रदेशातील तरुण मराठा आंदोलनात घुसला अन्..., मराठ्यांनी रंगेहात पकडलं, व्हिडिओ पाहा

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली कलरफुल फीचरची एन्ट्री; कसं वापरायचं? पहा एका क्लिकवर

Narhari Zirwal : शेतकऱ्यांचे कर्ज आणि व्याजमाफीसाठी थेट मुख्यमंत्र्यांशी बैठक; मंत्री झिरवाळांचे आश्वासन

Latest Marathi News Updates: हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे - न्यायमूर्ती

Maratha Reservation: 'मुंबईतील आंदोलकांसाठी शिदोरी रवाना'; बारडगाव सुद्रिक, भांबोरा, कानगुडवाडी ग्रामस्थांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT