Ramcharan Upasana Daughter name  esakal
मनोरंजन

Ramcharan Upasana Daughter name : नाव असावं तर असं, सगळीकडे रामचरण-उपासनेच्या मुलीच्या नावाची चर्चा

टॉलीवूडचा सुपरस्टार रामचरण आणि उपासना यांच्या मुलीचा नामकरण विधी नुकताच पार पडला असून त्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

युगंधर ताजणे

Upasana and Ram Charan posted pictures from the baby naming ceremony : टॉलीवूडचा सुपरस्टार रामचरण आणि उपासना यांच्या मुलीचा नामकरण विधी नुकताच पार पडला असून त्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही सेलिब्रेटी चर्चेत आले होते. आता तर देशातील उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांच्यासह त्यांची भेट घेतली आहे.

अंबानी परिवारानं रामचरणच्या मुलीला सोन्याचा पाळणा दिल्याची जिकडे तिकडे चर्चा रंगली असतानाच आता त्याच्या मुलीच्या नामकरणावरुन त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. रामचरणचा टॉलीवूडमध्ये चाहतावर्ग मोठा आहे. त्याला मुलगी झाल्याचे कळताच चाहत्यांनी देखील याचा मोठा आनंद साजरा केला होता. यासगळ्यात सोशल मीडियाव नेटकऱ्यांनी रामचरणला मुलीचे नाव काय ठेवले असा प्रश्न केला आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

२० रोजी उपासनेनं गोड बातमी देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. केवळ चाहतेच नाहीतर बॉलीवूड, टॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील रामचरणला शुभेच्छा दिल्या होत्या. यासगळ्यात रामचरणच्या लाडक्या लेकीचा नामकरण सोहळा पार पडला असून सगळ्यांनी त्याची कमालीची उत्सुकता होती. त्यांनी तिचे जे नाव ठेवले आहे त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. रामचरणच्या अनेक चाहत्यांनी नाव असावं तर असं, याला म्हणतात जगावेगळं नाव. असे म्हटले आहे.

रामचरणच्या लाडक्या लेकीचं नाव ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल ते म्हणजे एवढं मोठं नाव कुठे असतं का, त्याच्या मुलीचे नाव क्लिन कारा कोनिडिला असे असून ते ललिथा सहस्त्रनाममधून घेतले आहे. त्याचा अर्थ पूर्ण बदल असा होतो. अशा वेगळ्या नावामुळे रामचरण आणि उपासना हे चर्चेत आले आहे. यावेळी रामचरणच्या कुटूंबातील सदस्य तसेच उपासनेच्या कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपासनेनं या सोहळ्याचे काही फोटोही शेयर केले असून त्याला नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. तिनं ती पोस्ट शेयर करताना लिहिलं आहे की, क्लिन कारा कोनिडिला. हे नाव आम्ही ललिथा सहस्त्रनामधून घेतलं आहे.

याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्याचा अर्थ बदल असा होतो. एका वेगळ्या उर्जेतून वेगळ्या प्रकाशाकडे जाणे आणि स्वताची वेगळी वाट तयार करत बदल करणे असे म्हणूनही त्या नावाकडे पाहता येईल. असे उपासनेनं ती पोस्ट शेयर करताना म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT