rana 
मनोरंजन

दिवसाला ४० अंडी आणि ८ तास वर्कआऊट! 'या' भूमिकेसाठी राणा दग्गुबातीने घेतली होती खास मेहनत

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- साऊथ सुपरस्टार राणा दग्गुबाती आज १४ डिसेंबर रोजी त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा सिनेप्रवास लांबलचक राहिला असला तरी त्याने काही चांगल्या सिनेमांमध्ये काम केलं ज्यासाठी त्याला पुरस्कारांनी सन्मानित देखील केलं गेलं. मात्र असं असलं तरी राणा लक्षात राहतोय तो भल्लालदेवच्या भूमिकेमुळेच.

'बाहुबली' सिनेमात प्रभास जरी मुख्य भूमिकेत असला तरी राणाचा भल्लालदेव हा व्हिलनही चाहत्यांना तितकाच भावला. पिळदार शरीरयष्टी आणि उत्तम अभिनयाची जोड यामुळे अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला राणा. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या सिनेमात भल्लालदेवाची भूमिका साकारत राणाने अनेकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे या सिनेमासाठी राणाने भरपूर मेहनत घेतली होती. राणा सलग ८ तास जीममध्ये घाम गाळाचा. केवळ व्यायामच नाही तर हेल्दी डाएटही यासाठी महत्वाचं होतं. 

भल्लालदेव या भूमिकेला न्याय देण्यासाठी राणाला जीवतोड मेहनत घ्यावी लागली. त्याने त्याच्या शरीरयष्टीत आणि आहारातही काही महत्वाचे बदल केले. या भूमिकेला न्याय देण्यासाठी राणाला दररोज ४ हजार कॅलरीज घ्यावे लागत होते. त्यामुळे तो दिवसाला ४० अंडी आणि ८ तास वर्कआऊट करत होता.

इतकंच नाही तर त्याने जेवणाच्या वेळादेखील बदलल्या होत्या. साधारणपणे दिवसातून आपण ३ वेळा आहार घेतो मात्र राणा दिवसातून ८ वेळा जेवत होता. यात प्रत्येक दोन तासाने तो भात खायचा असं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी त्याने तब्बल १०० किलो वजन वाढवलं होतं. राणाचा भल्लादेव हा तितकाच शक्तिशाली दिसणं अपेक्षित होतं त्यामुळे त्याच्या अभिनयासोबतंच लूकवरही विशेष मेहनत घेतली गेली.   

rana daggubati birthday special know how he gain weight for bhallaldev character of bahubali 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Financial Scam : अमेरिकेत मोठा आर्थिक घोटाळा! भारतीय वंशाच्या ‘CEO’वर तब्बल ४००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Mumbai Local Megablock: महिन्याच्या पहिल्याच रविवारी खोळंबा, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकलवर परिणाम

Asian Youth Games 2025: चाळीतून उंच भरारी! पुण्याच्या चंद्रिकाने बहरीनमध्ये मुष्टियुद्धात सुवर्णपदकावर कोरले नाव

Purandar Airport : भूसंपादनासाठी हवे पाच हजार कोटी, प्रस्तावित पुरंदर विमानतळ; जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या प्रसिद्ध कलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांच्या कुटुंबाशी संवाद साधला

SCROLL FOR NEXT