Ranbir Kapoor Bollywood Actor Animal Movie  esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor : रणबीरचं 'ऑनस्क्रीन' तरी बापासोबत पटलेलं दिसत नाही! कोणत्या चित्रपटांमध्ये दिसला 'बापलेका' चा संघर्ष?

अॅनिमलचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यातून पिता पुत्र संघर्ष प्रेक्षकांना या चित्रपटातून दिसणार आहे.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor Bollywood Actor Animal Movie : प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या तुफान चर्चेत आहे, त्याच्या नावाची अशी चर्चा जेव्हा त्याचा आणि आलियाचा ब्रम्हास्त्र आला होता तेव्हा झाली होती. त्यानंतर तो आता संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलमुळे लाईमलाईटमध्ये आला आहे. या चित्रपटाकडून रणबीरच्या चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.

रणबीर हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखला गेलेला अभिनेता आहे. त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांकडे पाहिल्यास त्यानं विविध भूमिकांमधून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. मात्र या सगळ्यात त्याचे एकाच विषयांवर किंवा एकाच प्रकारच्या नात्यांवर आधारित चित्रपटांची संख्याही अधिक असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे त्याचा अॅनिमल प्रदर्शित होत असला तरी दुसरीकडे सोशल मीडियावर पुन्हा त्या चित्रपटांची चर्चा रंगताना दिसत आहे.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

अॅनिमलचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यातून पिता पुत्र संघर्ष प्रेक्षकांना या चित्रपटातून दिसणार आहे. याची कल्पना चाहत्यांना आली. आता आपण रणबीरच्या कोणत्या चित्रपटांतून अशाच प्रकारचा पिता पुत्र संघर्ष दिसून आला याविषयीची थोडक्यात माहिती घेणार आहोत. या यादीमध्ये त्याचा वेक अप सिद्, अजब प्रेम की गजब कहानी, ये जवानी है दिवानी, तमाशा सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

वेक अप सिद् (२००९) - रणबीरच्या करिअऱला जो बुस्ट मिळाला त्यात या चित्रपटाचा वाटा मोठा आहे. त्यानं रणबीर बॉलीवूडमध्ये चमकला. त्याच्या अभिनयाची चुणूक अनेकांना दिसून आली. त्याचा फॅनबेसही वाढला. वेक अप सिद् मध्ये सिद् ला त्याच्या आय़ुष्यात काय करायचं आहे हेच माहिती नाही. त्याची पॅशन वेगळी आहे. वडिल अनुपम खेर यांना त्याच्याविषयी चिंता आहे. ते त्याला नेहमीच समजावतात. पिता पुत्र यांच्या वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटात आहे.

अजब प्रेम की गजब कहानी ( २००९) -

रणबीरचा हा चित्रपट तुम्ही पाहिला का, यात देखील त्याचा वडिलांसोबतचा वाद दिसून येतो. त्यात त्याची भूमिका हॅपी गो लकी या टाईपची आहे. त्याला त्याच्या आयुष्याचे ध्येय काही समजलेलं नाही. त्यामुळे त्याला नव्हे तर त्याच्या वडिलांना चिंता आहे. वडील त्याला नेहमीच मोटिव्हेट करताना दिसतात. विनोदी ढंगाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

ये जवानी है दिवानी (२०१३) -

या चित्रपटानं रणबीरची वेगळीच इमेज त्याच्या चाहत्यांसमोर आली. दीपिकासोबतच्या रिलेशनची त्यावेळी चर्चा होत होती. चित्रपटाच्या स्टोरीविषयी बोलायचे झाल्यास रणबीरनं कबीर थापरची भूमिका केली होती. कबीर अर्थात बनी त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं नाराज झाला आहे. या सगळ्यात त्याला त्याच्या करिअरचा शोध घ्यायचा आहे. जगभरात भ्रमंती करायची आहे. वडिलांनी तो निर्णय का घेतला याचं उत्तर त्याला जेव्हा मिळते तेव्हा ते या जगातून गेलेले असतात. अशी साधारण त्या चित्रपटाची स्टोरी होती.

तमाशा - (२०१५)

रणबीरच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र तो काही म्हणावा इतका लोकप्रिय झाला नाही. इम्तियाज अलीनं त्याचे दिग्दर्शन केले होते. त्यात वडील आणि मुलगा यांच्या तणावपूर्ण नात्यावर भाष्य करण्यात आले होते. वेदनं वडिलांना सांगितले आहे की, त्यानं नोकरी सोडून दिली आहे आणि सहा महिने मौजमजा करणार आहे. यानंतर त्याचे आणि वडिलांचे संघर्ष सुरु होतात.

संजू - (२०१८)

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये रणबीरनं संजूची भूमिका साकारली जाते. रणबीरच्या आजवरच्या सर्वोत्तम चित्रपटामध्ये त्या चित्रपटाचा समावेश केला जातो. त्यामध्ये संजय दत्त आणि त्याचे वडील सुनील दत्त यांच्यातील वादाचे वेगवेगळे पैलु दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी दाखवले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

याशिवाय राजनीती, बर्फी, जग्गा जासूस यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारे रणबीरचं कौटूंबिक नातं हे समोर येतं. यातील एका चित्रपटामध्ये तो अनाथ दाखवण्यात आला आहे. एकात त्याचे वडीलांचा मृत्यू झाला आहे असेही समोर येते. अशा प्रकारे रणबीरच्या आतापर्यतच्या काही चित्रपटांकडे पाहिल्यास त्यातून त्याच्याभोवती फिरणारा बापलेकाचा संघर्ष हा फार नवा नसून यापूर्वीच्या अनेक चित्रपटांतून समोर आला आहे. असे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT