Ranbir Kapoor vs Allu Arjun  esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor : 'अल्लु अर्जुनचा रोल मला देता का?' रणबीर असं का म्हणाला?

कोणी काहीही म्हटले तरी गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडच्या चित्रपटांना टॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्यांनी मोठा दणका दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ranbir Kapoor Bollywood Actor praised inspire : कोणी काहीही म्हटले तरी गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडच्या चित्रपटांना टॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्यांनी मोठा दणका दिला आहे. कोरोनामध्ये बॉलीवूडचे चित्रपट चांगल्या कमाईच्या शोधात होते अशावेळी टॉलीवूडच्या चित्रपटांनी विक्रमी कमाई केली होती.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडच्या निर्मात्यांनी टॉलीवूडच्या कलाकारांना आपल्या चित्रपटांमध्ये घेण्याचे प्रमाण दिसते आहे. खासकरुन दाक्षिणात्य अभिनेत्रींची संख्या यात जास्त आहे. दुसरीकडे काही टॉलीवूडच्या निर्मात्यांनी देखील बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना आपल्या चित्रपटातून ब्रेक दिला आहे. त्यामध्ये केजीएफ, आरआरआर चित्रपटांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

Also Read - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

ब्रम्हास्त्रनंतर रणबीर कपूर हा वेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्याचा तू झुठी मैं मक्कार हा चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. त्यात त्याच्या जोडीला प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. यासगळ्यात रणबीरनं एका मुलाखतीमध्ये आपल्याला प्रसिद्ध अभिनेता पुष्पा फेम अल्लु अर्जुनची भूमिका मिळायला हवी. अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे रणबीर कपूर चर्चेत आला आहे.

त्याचं झालं असं की, रणबीरनं ब्रम्हास्त्रच्या एका इव्हेंटमध्ये ही गोष्ट सांगितली आहे. रणबीरनं टॉलीवूडच्या अल्लु अर्जुनचे खूप कौतूक केले आहे. यावेळी त्यानं आपल्याला त्याच्या चित्रपटातील भूमिका करायला आवडेल असेही म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्याला सर्वाधिक जास्त कुणी प्रभावित केले असेल तर ते अल्लु अर्जुननं केले आहे. असे रणबीरनं म्हटले आहे.

आलिया भट्टची गंगुबाई काठियावाडी, एस एस राजामौली यांचा आरआरआर आणि अल्लु अर्जुनचा पुष्पा या चित्रपटांची नावं घ्यावी लागतील. मला जर आगामी काळात संधी मिळाली तर त्यात अल्लु अर्जुनच्या पुष्पाची भूमिका मला करायला नक्की आवडेल. असे रणबीरनं म्हटले आहे. अल्लुच्या पुष्पाचा दुसरा पार्ट हा येत्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या त्याचे चित्रिकरण सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT