Ranbir Kapoor Bollywood Trolled Jai Mata Di  esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor : 'दारु पिऊन कुणी जय माता दी म्हणतं का'? नेटकऱ्यांनी रणबीरचे वाजवले कान!

प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल या चित्रपटानं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor Bollywood Trolled Jai Mata Di : प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल या चित्रपटानं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून रणबीरच्या या चित्रपटानं ब़ॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. आतापर्यत या चित्रपटानं सहाशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे.

रणबीर कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, रश्मिका मंदाना, अनिल कपीर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या अॅनिमलनं केवळ भारतच नाही तर जगभरातून देखील मोठी कमाई केली आहे. जेवढ्या प्रमाणात या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे तेवढ्याच प्रमाणात नेटकऱ्यांनी अॅनिमलवर सडकून टीकाही केली आहे. आता रणबीर कपूर एका व्हिडिओमुळे ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे.

२५ दिवसांत अॅनिमलनं ५३७.९७ कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्यात रणबीर कपूर हा वेगळ्याच कारणामुळे नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे. त्याचं झालं असं की, ख्रिसमसच्या निमित्तानं रणबीर आणि आलियानं आपल्या लाडक्या लेकीसोबतचा फोटो आणि व्हिडिओ शेयर केला आहे. त्यावर लाखो चाहत्यांनी दिलेल्या कमेंट खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

कपूर फॅमिलीच्या वतीनं ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रणबीर कपूर हा ख्रिसमस केकवर वाईन टाकताना दिसत आहे. त्यानंतर तो चॉकलेट केक फायर करतो. त्या केकला फायर करताना आलिया थोडीशी घाबरलेली दिसून येते. यावेळी रणबीर कपूर जय माता दी म्हणताना दिसतो. नेटकऱ्यांना ही बाब आवडलेली दिसत नाही. त्यांनी त्यावरुन रणबीरला ट्रोल केले आहे.

त्या व्हिडिओमध्ये कुणाल कपूर, नव्या नवेली नंदा, आदर जैन आणि जहान देखील दिसतात. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. यापूर्वी देखील रणबीर कपूर हा त्याच्या अॅनिमल चित्रपटावरुन चर्चेत आला होता. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी धारेवर धरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT