Ranbir Kapoor Break: Esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor Break: अ‍ॅनिमलनंतर रणबीर कपूर अभिनयातून घेणार ब्रेक! कारणही आलं समोर

Vaishali Patil

Ranbir Kapoor Break: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. त्याचा आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर रिलिज झाल्यानंतर चाहते या सिनेमासाठी उत्सूक आहे. त्यातच या चित्रपटातील पहिल्या गाण्याने देखील सोशल मिडियावर धुराळा उडवला आहे.

त्याचबरोबर रणबीर 'रामायण' चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे. मात्र आता रणबीरच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. रणबीर हा काही दिवस अभिनयातून ब्रेक घेणार असल्याची घोषणा त्याने स्वत:च केली आहे.

आता रणबीर चित्रपटांमधुन सहा महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. या मागचे कारणही रणबीरने सांगितले आहे. रणबीर हा ब्रेक आपली लाडकी लेक राहासाठी घेणार आहे.

या ब्रेकमुळे त्याच्याकडे वेळ असणार आहे जो तो त्याच्या मुलीसोबत घालवणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

रणबीरने आलियासोबत लग्न केल्यानंतर मुलगी राहाचे स्वागत केले आहे. त्याची आणि राहाची खुपच चांगली बॉन्डिग असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.

रणबीरने नुकतच झूमवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी रणबीर कपूरने त्याच्या ब्रेकबद्दल सांगितले.

तो म्हणाला की, राहाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांत तो शूटिंगमध्ये खुपच व्यस्त होता. त्यामुळे आपल्या लेकीसोबत वेळ घालवण्याची संधी त्याला मिळाली नाही.त्यामुळे आता मुलीसोबत कॉलिटी टाईम घालवण्यासाठी तो चित्रपटांमधून 6 महिन्यांचा ब्रेक घेणार आहे.

यामुलाखतीत त्याने राहाबद्दल अनेक खुलासे केले. ती आता बोलते आणि रांगतेही असंही त्याने सांगितले.

रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा 'तू झुठी में मक्कार' या चित्रपटात दिसला होता. आता तो अॅनिमल चित्रपटात रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्यासोबत दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT