animal ranbir kapoor pre teaser Animal Scene Copy ranbir kapoor rashmika mandanna bobby deol movie animal copy from south korean film oldboy  Esakal
मनोरंजन

Animal Scene Copy: चोरटा बॉलिवूड! रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' मधला सीनही कोरीयन चित्रपटातून ढापला...व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Animal Scene Copy: गेल्या अनेक दिवसांपासून रणबीरच्या बहूप्रतिक्षित चित्रपट 'अ‍ॅनिमल' ची खुपच चर्चा होती. ब्रम्हास्त्रनंतर तो मोठ्या पडद्यावर एंट्री करणार असल्यानं चाहते उत्सूक आहे.

त्यातच रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या अॅनिमल चा प्री टीझर रविवारी रिलीज करण्यात आला.

टीझरमध्ये रणबीर मुखवटा घातलेल्या अनेक लोकांच्या गॅगला एकटाच भिडतांना दिसला

टीझरमध्ये रणबीरचा पुर्ण लुक दिसला नसला तरी तो यात खुपच भयानक अवतारात दिसत आहे. हातात कुऱ्हाड घेऊन तो राग काढतो आणि एकट्याने सगळ्याना भिडतोय.

या प्री टीझरने सर्वांचे लक्ष वेधून तर घेतले मात्र काही लोकांना या चित्रपटाचा टिझर चोरीचा वाटला. त्यामुळे त्यांनी सोशल मिडियावर राग व्यक्त करण्यास सुरवातही केली आहे.

दक्षिण कोरियाच्या 'ओल्डबॉय' चित्रपटातुन रणबीरचा तो फाइट सीनची कथितपणे कॉपी केल्याचा आरोप त्यांनी दिग्दर्शकावर केलाय.

त्यामुळे त्यांनी या चित्रपटाच्या टिमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'ओल्डबॉय' हा हिट चित्रपटांपैकी एक आहे ज्याचे आजही बरेच चाहते आहेत.

टीझरमध्ये रणबीर पांढरा धोतर आणि कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. त्याची दाढी आणि केस लांब ठेवले आहेत. कबीर सिंग आणि अर्जुन रेड्डी या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे संदीप रेड्डी वंगा यांनी यांच्या खांद्यावरच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी आहे.

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सीरीज, मुराद खेतानी यांच्या सिने१ स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सद्वारे निर्मित, अॅनिमल ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल मुख्य भुमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT