Samshera fame ranbir news  esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'हार्ली डेव्हिडसन' मला मिळाली, ओरडा संजुनं खाल्ला!

ज्या चित्रपटाची गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहत आहे तो समशेरा आता प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. करण मल्होत्रानं त्याचं दिग्दर्शन केलं आहे. त्यात रणबीर कपूर, संजय दत्त हे प्रमुख भूमिकेत आहे.

युगंधर ताजणे

Samshera Movie: ज्या चित्रपटाची गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहत आहे तो समशेरा आता प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. करण मल्होत्रानं त्याचं दिग्दर्शन केलं आहे. त्यात रणबीर कपूर, संजय दत्त हे प्रमुख भूमिकेत आहे. सध्या त्याचे प्रमोशन (bollywood movies) सुरु आहे. यानिमित्तानं रणबीरनं वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचे काय आहे, रणबीरनं काही वर्षांपूर्वी संजय दत्तवर (sanjay dutt) आधारित संजु नावाच्या बायोपिकमध्ये काम केलं होतं. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. रणबीरच्या भूमिकेचं कौतूक झालं होतं.

रणबीरच्या समशेराकडून त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. यानंतर त्याचा (trending entertainment news) बिग प्रोजेक्ट, बिग बजेट असा ब्रम्हास्त्र हा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये तो आलिया भट्ट सोबत दिसणार आहे. ब्रम्हास्त्र देखील सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्याच्या ट्रेलरला, गाण्यांना चाहत्यांनी पसंत केलं आहे. समशेराच्या निमित्तानं रणबीरनं काही ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या. त्यात त्यानं आपला काही पुनर्जन्मावर विश्वास नसल्याचे सांगत मात्र त्याच्यावर काही पुस्तकं मी वाचली आहेत. त्यामुळे मला जेव्हा माझ्या मुलाच्या नावावर काही प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याला काय उत्तर द्यावं सुचत नाही.

रणबीर आणि संजय दत्तचं नातं हे अनेकांना माहिती आहे. तो लहानपणापासून संजय दत्तचा मोठा फॅन राहिला आहे. एका मुलाखती दरम्यान आपल्यामुळे संजय दत्तला वडिलांचा कसा ओरडा खावा लागला होता. याची आठवण रणबीरनं सांगितली आहे. ती आठवण अशी की, रणबीरला संजय दत्तनं हार्ली डेव्हिडसन नावाची गाडी भेट म्हणून दिली होती. एवढी महागडी गाडी गिफ्ट केल्यानंतर संजयला ऋषी कपूर यांचा ओरडा खावा लागला होता. मला मात्र खूप वाईट वाटले. जेव्हा पपा संजु सरांना बोलले तेव्हा.

अनेकांना ही गोष्ट माहिती असेल की, संजु चित्रपटामध्ये रणबीरनं संजय दत्तची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटातील ओपनिंग सीनमध्ये रणबीर जेव्हा जेलमधून बाहेर पडतो तेव्हाचा एक फोटो दिग्दर्शकानं संजय दत्तला पाठवला होता. तो फोटो पाहून संजु सर राजु हिरानीला म्हणाले होते, अरे माझाच फोटो मला का पाठवला, एवढा प्रभाव संजुचा माझ्यावर होता. अशी कबुली रणबीरनं यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT