Ranbir Kapoor In Ramayan Esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: प्रभासनंतर आता रणबीर साकारणार श्रीराम! भुमिका साकारण्यासाठी केला 'या' गोष्टींचा त्याग!

Ranbir Kapoor In Ramayan: रणबीर कपूर लवकरच नितीश तिवारीच्या रामायणमध्ये दिसणार आहे.

Vaishali Patil

Ranbir Kapoor In Ramayan: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या त्याच्या अ‍ॅनिमल या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी त्याच्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, जो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

या टीझरमध्ये रणबीर आणि बॉबी देओल अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसले. रणबीरचा हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर आहे. तर दुसरीकडे रणबीर आणखी एका चित्रपटासाठी चर्चेत आहे तो म्हणजे 'रामायण' चित्रपटामुळे.

'रामायण' या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तरी देखील या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर चर्चा होत असते. या चित्रपटात रणबीर आणि आलियाची जोडी राम-सीता ही भुमिका साकारणार होते मात्र त्यानंतर आलियाचं नाव या प्रोजेक्टमधुन काढण्यात आले आणि साऊथ स्टार साई पल्लवीच्या नावाची चर्चा सुरु झाली.

मीडिया रिपोर्टनुसार रणबीरने ही भुमिका साकारण्यासाठी काही गोष्टी सोडल्या असल्याचं बोललं जात आहे. रणबीर कपूरने रामसारखे शुद्ध होण्यासाठी दारू आणि मांस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

कोइमोईने दिलेल्या वृत्तानुसार, आता रणबीरने मद्यपान आणि मांसाहार करणं पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीननं हा निर्णय त्याची सार्वजनिक प्रतिमा जपण्यासाठी नाही तर श्री रामाच्या भुमिकेला न्याय देण्यासाठी घेतला आहे असं सांगण्यात येत आहे.

रिपोर्टनुसार, रणबीरला श्री रामसारखी जीवनशैली जगायची आहे म्हणुन तो लेट नाईट पार्टीतही जाणंही टाळतं आहे, असं म्हटलं जात आहे.

रणबीर आणि साई या चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारी 2024 पासून सुरू करणार आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात रणबीर प्रभू राम आणि साई सीता यांची भुमिका साकारणार आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट 2024 पर्यंत संपणार आहे.

तर रणबीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT