Ranbir Kapoor Trolled For Alia Bhatt Lipstick statement  esakal
मनोरंजन

Alia Bhatt : 'नवऱ्याला मी लिपस्टिक लावलेली आवडत नाही', आलिया बोलली रणबीरनंही दिली प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बी टाऊन कपल आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor Trolled For Alia Bhatt Lipstick statement : प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बी टाऊन कपल आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. दोघेही बॉलीवूडमध्ये सर्वाधिक लाईमलाईटमध्ये असणारे कपल आहे. ब्रम्हास्त्रमध्ये त्यांनी कमाल केली होती. त्याचा दुसरा भाग पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

आलियाला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. गंगुबाई काठियावाडी मधील तिच्या भूमिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या भूमिकेचे कौतुकही झाले होते. त्या भूमिकेसाठी परिक्षकांनी तिची राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी तिच्या एका प्रतिक्रियेमुळे रणबीरला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

रणबीरनं मला बाहेर जाताना लिपस्टिक पुसण्यास सांगितली होती. त्यामुळे मला खूप राग आला होता. आणि नवलही वाटले होते. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन रणबीरला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. रणबीरला माझे लिपस्टिक लावणे आवडले नव्हते. रणबीरच्या अशा वागण्यानं सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती.

नेटकऱ्यांनी आलियाला तुला आता रणबीरकडून वेगळी आचारसंहिता लिहून घेण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. या सगळ्यात रणबीरनं त्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. आलियानं लिपस्टिक लावू नये कारण तिचा नैसर्गिकपणा रणबीरला आवडतो. रणबीर म्हणतो, मला ज्याप्रकारे बोलले जाते किंवा ट्रोल केले जाते ते चूकीचे आहे. अनेकांना मला काय महत्वाचे वाटते हे जाणून घ्यायचे नाही.

झूम सेशनमधून चाहत्यांशी संवाद साधताना त्यानं त्या प्रतिक्रियेवर स्पष्टीकरण दिले आहे. मी त्या सोशल मीडियावर नाही. त्यामुळे मला त्या लोकांना प्रतिक्रिया देणं फारसं महत्वाचं वाटत नाही. मला वाटतं काही अंशी नकारात्मकता महत्वाची आहे. एक कलाकार म्हणून तुम्हाला ती मदत करते. तुम्ही त्याचा सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

कधी कधी एक सेलिब्रेटी म्हणून तुमच्याविषयी खूप काही लिहिले जाते बोलले जाते. मात्र त्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही प्रतिक्रिया देणे महत्वाचे नाही. लोकांना माझ्या कामाविषयी बोलण्याची परवानगी आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया महत्वाची ठरते. पण म्हणून त्यांनी कोणत्याही गोष्टीवरून आम्हा कलाकारांना दोष देणे चूकीचे आहे. असेही रणबीरनं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT