Randeep Hooda Wedding: Esakal
मनोरंजन

Randeep Hooda Wedding: "महाभारतात जसं अर्जुनाने मणिपूरची.." लग्नाची घोषणा करत रणदीप-लिननं शेयर केली पोस्ट

अभिनेता रणदीप हुड्डा गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

Vaishali Patil

Randeep Hooda-Lin Wedding: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री लिन लैश्रामसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. आता अभिनेता रणदीप हुड्डाने त्याच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे.

रणदीप आता नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. तो गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.

रणदीप कधी आणि कुठे लग्न करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. आता ही घोषणा खुद्द रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने लग्नाच्या तारखेपासून लग्नाचे ठिकाण आणि रिसेप्शनपर्यंतची माहिती चाहत्यांना सांगितली आहे.

या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'आमच्याकडे रोमांचक बातमी आहे.'

तर या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, 'महाभारतात जसं अर्जुनाने मणिपूरची योद्धा राजकुमारी चित्रांगदासोबत लग्न केले होते. आम्ही देखील तसेच घरच्यांच्या आशीर्वादाने लग्न करणार आहोत.

आमचे लग्न 29 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील इंफाळ येथे होणार आहे. लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन होणार आहे. या नव्या प्रवासात आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे'.

मिडिया रिपोर्टनुसार, रणदीप आणि लिनच्या लग्नाची तयारी सुरु झाली असून 29 नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या लग्नाचे विधी सुरू होतील आणि रात्रीपर्यंत चालतील. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम पारंपरिक पद्धतिने लग्न करणार आहे.

रणदीप हुड्डा आणि लिनच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. यानंतर मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन होणार आहे, लिन लैश्राम रणदीप हुड्डापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

लिन ही मणिपूरमधील प्रसिद्ध मॉडेल आणि बिझनेस वूमन आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुपचाही ती एक भाग आहे. लिन ही देखील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अलीकडेच सुजॉय घोषच्या 'जाने जान' या चित्रपटात दिसली होती ती याशिवाय 'ओम शांती ओम', 'रंगून' आणि 'मेरी कॉम' या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT