Randeep Hooda Biopic on Swatantrya Veer Savarkar  esakal
मनोरंजन

Randeep Hooda Post : 'जिथं सावरकर अकरा वर्ष कैद होते तिथं मी....' सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्तानं रणदीपची खास पोस्ट

सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्तानं रणदीपनं (Randeep Hooda Biopic On Veer Savarkar) जी पोस्ट शेयर केली आहे त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Randeep Hooda Biopic : प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा आता चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात त्यानं त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शेयर केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यावेळी रणदीपनं (Randeep Hooda news) व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

रणदीपनं जेव्हा त्याच्या नव्या चित्रपटाचा टीझर व्हायरल केला होता तो पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले होते. त्यातील त्याची भूमिका, त्याची देहबोली, वेशभूषा या साऱ्याचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकची प्रेक्षक (Swatantrya Veer Savarkar) आतूरतेनं वाट पाहत असून त्यातील रणदीपच्या भूमिकेची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

या सगळ्यात रणदीपनं अंदमान मधील सेल्युलर जेलचा फोटो शेयर करुन त्यासंबंधी एक पोस्ट शेयर केली आहे. यावेळी रणदीपनं (Vinayak Damodar Savarkar biopic) म्हटलं आहे की, जिथं सावरकरांनी अकरा वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा भोगली त्या जेलमध्ये मी स्वताला बंद करुन घेतले. तेव्हा लक्षात आले की, मी २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिथं राहू शकलो नव्हतो.

वीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये रणदीपनं महत्वाची भूमिका साकारली असून त्यासाठी त्यानं प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे. त्यानं सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित साहित्याचा अभ्यास केला आहे. त्यातून त्यानं सावरकर यांचे व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानं रणदीपनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यात तो म्हणतो मी स्वताला सात बाय अकरा फुटांच्या जेलमध्ये बंद करुन घेतले आहे. जिथं सावरकर अकरा वर्षे होते. रणदीपच्या त्या फोटोंवर चाहत्यांनी त्याला कमेंट त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

F-16 लढाऊ विमान हायवेवर कोसळलं, उड्डाणानंतर २ मिनिटांनी रडारवरून गायब; दुर्घटनेचा VIDEO आला समोर

Gold Rate Today: सलग 7 व्या दिवशी सोनं महागलं! सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा ताजा भाव

Kolhapur police action : दहशतीसाठी पिस्तुलाचा वापर, खून मारामारी गंभीर गुन्हे, कोल्हापूर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

Rinku Singh : वडील गंभीर आजाराशी देतायत झुंज, रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर; रिंकु सिंह T20 वर्ल्डकपला मुकणार?

Latest Marathi News Live Update : वाईनशॉप हटवण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT