Randeep Hooda Helping Hands News: अभिनेता रणदीप हुडा हा बॉलीवुडमधला दमदार अभिनेता. रणदीपने आजवर अनेक सिनेमांमधुन स्वतःचं स्थान कमावलं आहे. रणदीप खऱ्या अर्थाने प्रत्येक भुमिकेसाठी मेहनत घेत असतो.
रणदीप लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमात अभिनय करणार आहे. रणदीपचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. रणदीपने हरियाणात जाऊन पुरग्रस्त बांधवांच्या घरी जाऊन मदत केलीय.
प्रसिद्ध NGOसंस्था खालसा एडने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केली आहे. या फोटो, व्हिडीओत रणदीपने भगव्या रंगाचा कपडा बांधलेला दिसतो.
याशिवाय पुरग्रस्त व्यक्तीला स्वयंपाकाच्या तेलाची बाटली देतो. रणदीर पूरग्रस्त समुदायांना मदत करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत.
भारतात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्याने मोठी उद्ध्वस्त झाली आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागाला पुराचा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून लोकांना खाण्यापिण्याची कमतरता आहे.
तीच अवस्था हरियाणाची आहे. अशा परिस्थितीत रणदीप हुड्डा यांनी लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि हरियाणातील पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे वाटली.
खालसा एडने रणदीपच्या शेअर केलेल्या या व्हिडीओत अभिनेत्यासोबत त्याची मैत्रीण लिन लैश्राम देखील या उदात्त कार्यात आपला सहभागी झालेली दिसतेय.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी पाणी साचलेल्या भागातून जाताना तो दिसला. अनेक बांधवांच्या घरी जाऊन रणदीपने स्वतःच्या हाताने त्यांना मदत केली.
रणदीपच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणदीपने नुकतेच 'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट आहे.
उत्कर्ष नैथानी सोबत रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि सह-लेखन केलंय. काही दिवसांपुर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये रणदीपच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.