Randeep Hooda Lost 26 Kg Weight For Swatantrya Veer Savarkar Role Had 1 Khajoor 1 Glass of Milk For 4 Months
Randeep Hooda Lost 26 Kg Weight For Swatantrya Veer Savarkar Role Had 1 Khajoor 1 Glass of Milk For 4 Months  sakal
मनोरंजन

Randeep Hooda: सावरकर साकारण्यासाठी घटवलं 26 किलो वजन; 4 महीने फक्त एक खजूर खाऊन जगला रणदीप..

नीलेश अडसूळ

Randeep Hooda: अत्यंत मेहनती, हुशार आणि दमदार अभिनयाने सर्वांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे रणदीप हुडा. बॉलिवूड मध्ये आज रणदीपला वेगळी ओळख मिळाली आहे. त्याच्या प्रत्येक भूमिका या वेगळ्या धाटणीच्या आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या आहेत.

त्यात सध्या चर्चा आहे की, रणदीप हुडाच्या आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची. या चित्रपट तो विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकरणार आहे. काल सावरकरांची जयंती होती. या निमित्ताने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला.

हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. अभिनेता रणदीपने सावरकरांची साकारलेली भूमिका पाहून सगळेच भारवले आहेत. एवढेच नाही तर या चित्रपटाचे तो दिग्दर्शनही करत असल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

अशातच या भूमिकेसाठी त्याने किती मेहनत घेतली हे समोर आलं आहे, ते आज पाहूया..

(Randeep Hooda Lost 26 Kg Weight For Swatantrya Veer Savarkar Role Had 1 Khajoor 1 Glass of Milk For 4 Months ) 

या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित यांनी केली आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुडाने कशी मेहनत घेतली याबाबत स्वतः निर्मात्यांनी सांगितले आहे. या मध्यमाशी बोलताना ते म्हणाले, रणदीपने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. गेली काही दिवस तो सातत्याने वीर सावरकरांच्या चरित्राचा अभ्यास करतोय.'

'रणदीपने या भूमिकेसाठी 26 किलो वजन कमी केले आहे. जेव्हा या चित्रपटासाठी आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा, त्याचे वजन 86 किलो होते. त्या दिवसापासूनच तो या व्यक्तिरेखेत शिरत गेला आणि सावरकरांशी एकरूप झाला.'

'या भूमिकेत कोणतीही कसर सोडायची नाही हे त्याने आधीच ठरवलं होतं त्यामुळे त्याने 4 महिने फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध प्यायले अगदी शूटिंग संपेपर्यंत. एवढेच नाही तर कोणतेही नकली केस न वापरता त्याने त्याचे स्वतःचे केस देखील कापले.' असं यावेळी निर्माते म्हणाले.

पुढे आनंद पंडित म्हणाले की, ''रणदीप हुडाने ही भूमिका साकारताना कोणतेही प्रोस्थेटिक वापरले नाही. जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने ही भूमिका काशी फुलवता येईल यावर त्याने भर दिला आहे. त्यामुळे ट्रेलर मधून त्याची मेहनत तुम्हाला दिसेलच.

हा चित्रपट आधी महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. परंतु काही कारणामुळे त्यांचे बिनसले आणि त्यांनी या चित्रपटाला नकार दिला. पण नंतर हा चित्रपट दिग्दर्शित करण्याची धुरा रणदीपनेच आपल्या खांद्यावर घेतली. चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली नसली तरी येत्या वर्षात हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT