Randeep Hooda esakal
मनोरंजन

Randeep Hooda: "हा अँटी-प्रोपगंडा चित्रपट आहे"; स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डा थेटच बोलला!

Randeep Hooda: एका मुलाखतीमध्ये रणदीपनं सांगितलं आहे की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट अँटी-प्रोपगंडा चित्रपट आहे. चित्रपटाबद्दल रणदीप आणखी काय म्हणाला? जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा लवकरच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काल (4 मार्च) रिलीज झाला. ट्रेलरमधील रणदीपच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात रणदीपनं विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. अशातच आता एका मुलाखतीमध्ये रणदीपनं सांगितलं आहे की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट अँटी-प्रोपगंडा चित्रपट आहे. चित्रपटाबद्दल रणदीप आणखी काय म्हणाला? जाणून घेऊयात...

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रणदीप? (Randeep Hooda On Swatantra Veer Savarkar film)

आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाला 'प्रोपगंडा फिल्म' म्हटलं जात आहे, याबद्दल काय सांगशील? असा प्रश्न ANI च्या मुलाखतीत रणदीपला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना रणदीप हुड्डा म्हणतो, "या प्रश्नाचं मी उत्तर देतो की, हा 'अँटी-प्रोपगंडा' चित्रपट आहे. सावरकरांविरोधात अनेक वर्षांपासून चालवलेला प्रपोगंडा, त्यांच्याबद्दल बोलल्यात आलेले वेगवेगळे शब्द त्या सर्वांचा भांडाफोड करण्यासाठी आणि सत्य लोकांसमोर आणण्यासाठी हा चित्रपट आहे." रणदीपच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पाहा व्हिडीओ:

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल रणदीप म्हणाला, "हा चित्रपट 22 मार्चला रिलीज होत आहे, हा योगायोग आहे. मी हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज करणार होतो."

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाची स्टार कास्ट (Swatantra Veer Savarkar film Star Cast)

रणदीपसोबतच या चित्रपटात अंकिता लोखंडे, अपिंदरदीप सिंह यांनी देखील काम केलं आहे.झी स्टुडिओ, आनंद पंडित, संदीप सिंग, योगेश रहार आणि रणदीप हुडा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद या उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिल्या आहे. 22 मार्च रोजी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

रणदीपचे चित्रपट

रणदीप हा सरबजीत, हायवे, डरना जरूरी है या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता रणदीपचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटातील अभिनय बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT