Newlyweds Randeep Hooda and Lin Laishram  Esakal
मनोरंजन

Randeep-Lin Laishram: स्वित्झर्लंड, युरोप नाही तर भारतात 'या' ठिकाणी रणदीप पत्नीसोबत गेलाय हनीमूनला, रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

सध्या रणदीप आणि लिनचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Vaishali Patil

Newlyweds Randeep Hooda and Lin Laishram: सध्या सर्वत्र नववर्षाचा उत्साह पहायला मिळत आहे. सर्वजण एकीकडे सरत्या वर्षाला निरोप तर दुसरीकडे नव्या वर्षाचं स्वागत करत आहेत. त्यात अनेक कालकार नववर्ष साजरा करण्यासाठी आपल्या जोडीदारासोबत फिरायला गेले आहेत.

सध्या सोशल मिडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातच बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा पत्नी लिन लैश्रामसोबत एकत्र नववर्ष साजरा करत आहेत.

अशा परिस्थितीत आता रणदीप हुड्डाने 31 डिसेंबर रोजी पत्नीसोबतचे फोटो शेअर करत सरत्या वर्षाला निरोप दिला आहे. सध्या रणदीप आणि लिनचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

तर आता रणदीप हुड्डा आपल्या पत्नीसोबत केरळला नवीन वर्ष साजरा करत आहेत. त्याने याचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. रणदीप हुड्डाने 31 डिसेंबर रोजी पत्नी लिन लैश्रामसोबतच्या फोटो शेअर केले आहेत.

पहिल्या फोटोमध्ये रणदीप हुड्डा लिनसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये हे जोडपे केरळमध्ये सूर्यास्ताचा आनंद घेत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, '2023 चा शेवटचा सूर्यास्त.' रणदीप हुडाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.

रणदीप हुड्डाने नुकतच लिनसोबत लग्नगाठ बांधली. त्यांचे लग्न या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेले लग्न होते. मणिपुरीच्या मीतेई समुदायाच्या रितीरिवाजानुसार रणदीप आणि लिन यांनी लग्न केले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त या जोडप्याने दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी रिसेप्शनचे आयोजन केले होते. रिसेप्शनमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींही पोहचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: फ्री रेशन योजनेत ३ मोठे बदल! ८० कोटी रेशनधारकांवर थेट परिणाम होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

महत्त्वाचे अपडेट्स : IPL आता मार्च-मे मध्ये नव्हे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार? दोन टप्प्यातही होऊ शकतं आयोजन; नेमकं कारण काय?

Konkan Railway: कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक जाहीर! मांडवी, तेजससह अनेक गाड्यांच्या वेळा बदलणार, काय परिणाम होणार?

“आरारारा खतरनाक…” ‘मुळशी पॅटर्न २’ लवकरच येणार, प्रवीण तरडे म्हणाले...

Latest Marathi News Live Update : उल्हासनगरात नालेसफाईचा फज्जा; काढलेली घाण पुन्हा नाल्यात

SCROLL FOR NEXT