Randeep Hooda esakal
मनोरंजन

Randeep Hooda: "स्वातंत्र्यवीर सावरकर" चित्रपटासाठी रणदीपचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "तू खरा हिरो आहेस!"

Randeep Hooda: रणदीपनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) 'स्वातंत्र्यवीर सावरकर'(Swatantra Veer Savarkar) या चित्रपटाची अनेकजण उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचं सध्या रणदीप प्रमोशन करत आहे. अशताच आता रणदीपनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

रणदीप हुड्डाचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

रणदीपनं त्याचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणदीपनं केलेलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. रणदीपनं शर्टलेस फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "काला पानी" या फोटोला रणदीपनं Who Killed His Story, Swatantrya Veer Savarkar या दोन हॅशटॅग्सचा वापर केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

रणदीपनं शेअर केलेल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं रणदीपच्या फोटोला कमेंट केली, "तू खरा हिरो आहेस!" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "आपला ख्रिश्चन बेल"

रणदीपनं चित्रपटासाठी कमी केलं वजन

रणदीपनं 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी 30 किलो वजन कमी केलं आहे, असं एका मुलाखतीमध्ये रणजीत सावरकर यांनी सांगितलं. ते म्हणाले, "रणदीप हुड्डा यांच्यासोबत माझी अनेकदा चर्चा झाली. त्यांनी खूप मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे, त्यांनी 30 किलो वजन कमी केले आहे. मी अजून चित्रपट पाहिलेला नाही पण हा चित्रपट चांगला असेल याची मला खात्री आहे."

रणदीपनं घर विकलं

"हा सिनेमा तयार करण्यासाठी मला कोणीही मदत केलेली नाही. या सिनेमासाठी मी माझं घर विकलं आहे. मी हा सिनेमा सावरकरांवर झालेला अन्याय दाखवण्यासाठी बनवला आहे.", असं रणदीपनं मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

कधी रिलीज होणार 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट?

'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडे, अपिंदरदीप सिंह यांनी देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT