randeep hooda wedding with lin laishram mahabharat theme wedding photos viral on internet SAKAL
मनोरंजन

Randeep Hooda Wedding: पारंपरिक मणिपुरी थाटात झालं रणदीप हु़डाचं लग्न, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

Randeep Hooda wedding News: रणदीप हुडाने महाभारताच्या थीमनुसार थाटामाटात लग्न केलंय

Devendra Jadhav

Randeep Hooda Wedding: बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमधून दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा रणदीप हुडा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणदीप हुडाने काल मणिपुरी मॉडेल आणि अभिनेत्री लिन लैश्रामसोबतच्या लग्न केलं.

गेल्या काही दिवसांपासुन रणदीप - लिन यांच्या लग्नाची चर्चा होती. दोघेही महाभारत थीमनुसार लग्न करणार असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर रणदीप - लिन काल लग्नबंधनात अडकले.

रणदीप - लिनच्या लग्नाचा अस्सल मणिपुरी थाट

रणदीप - लिन या दोघांनी 29 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील इंफाळ येथे त्यांचे जवळचे सदस्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले.

रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांनी महाभारतातील कल्पना घेऊन पौराणिक थीम असलेली लग्नाची योजना आखली. महाभारतात पाच पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनने मणिपूरला भेट देऊन राज्याची राजकुमारी चित्रांगदा हिच्याशी विवाह केला होता.

रणदीप आणि लिनच्या लग्नाची सुद्धा हीच थीम होती. रणदीप लिन यांनी डिझायनर कपडे वगळता पारंपारिक मणिपुरी थाटात एकमेकांसोबत लग्न केलं.

त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. लग्नानंतर रणदीप आणि लिन मुंबईत रिसेप्शन देणार आहेत. मात्र, रिसेप्शनची तारीख अद्याप ठरलेली नाही.

कोण आहे रणदीपची बायको लीन?

लिन ही मणिपूरमधील प्रसिद्ध मॉडेल आणि बिझनेस वूमन आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुपचाही ती एक भाग आहे.

लिन ही देखील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अलीकडेच सुजॉय घोषच्या 'जाने जान' या चित्रपटात दिसली होती ती याशिवाय 'ओम शांती ओम', 'रंगून' आणि 'मेरी कॉम' या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

रणदीपचं वर्कफ्रंट

रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'तेरा क्या होगा लवली'मध्ये दिसणार आहे, ज्यात इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो वीर सावरकर यांच्या जीवनावरील स्वातंत्र वीर सावरकर या चित्रपटात दिसणार आहे.

त्याचबरोबर तो नीना गुप्ता, गुलशन ग्रोवर आणि संजय मिश्रा यांच्यासोबत 'पछत्तर का छोरा' मध्ये काम करणार आहे. याशिवाय तो 'लाल रंग 2' आणि 'मर्द' या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT