rang maza vegla deepa doing vatpaurnima worship for kartik sakal
मनोरंजन

नाते संपले तरी प्रेम कायम.. कार्तिकसाठी दीपा करणार वटपौर्णिमेचा उपवास

'रंग माझा वेगळा' या मालिकेत एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

नीलेश अडसूळ

rang majha vegla : स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहेत. टीआरपीच्या रांगेत ही मालिका अग्रेसर आहेच शिवाय अनेक ट्विस्ट या मालिकेत प्रत्येक भागात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत कार्तिक दीपा ही जोडी बरीच लोकप्रिय आहे. काळ्या रंगाच्या वर्ण द्वेषावारून सुरू झालेला या मालिकेचा प्रवास आता अधिक रंजक झालेला आहे. मालिकेत काही वर्षांपूर्वी कार्तिकने दीपावर संशय घेतल्याने दीपा आणि कार्तिक वेगळे झाले होते. यावेळी दीपला दोन मुली झाल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी कार्तिककडे असते तर एक मुलगी दीपा कडे असते. आता या मुलींमुळे दीपा आणि कार्तिक एकत्र येणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. (rang majha vegla deepa doing vatpaurnima worship for kartik nsa95)

सध्या मालिकेत या मालिकेत असे दाखवण्यात आले आहे की श्वेताच्या डोक्यात एक नवी जीवघेणी कल्पना येते. ती एक चिकट द्रवपदार्थ घरात टाकते ज्यावर घसरून दीपिकाला म्हणजे कार्तिक आणि दीपाच्या मुलीला दुखापत होते, याच दरम्यान कार्तिक आयेशाशी लग्न करणार असतो पण दीपिकाला दुखापत झाल्याने तो लग्नाला पोहोचू शकत नाही. हे लग्न मोडल्याने डोक्यात राग घालून आयेशा कार्तिकची पोलिसात तक्रार करते आणि पोलिस त्याला अटक करण्यासाठी येतात.

या प्रसंगाने दीपा आणि कार्तिकचं नातं निर्णायक वळणावर आलं आहे. कार्तिकीला कार्तिकच आपले बाबा आहेत हे सत्य कळल्याने ती आईला म्हणते, 'बाबा संकटात आहे तर तू वटपौर्णिमेचं व्रत कर' त्यामुळे दीपालाही तिच्या प्रेमाची जाणीव होते आणि आपल्या नवऱ्यासाठी ती उपवास करायला तयार होते. येत्या भागात वाटपौर्णिमेच्या दिवशी कार्तिक तुरुंगात असेल तर त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी दीपा वाटपौर्णिमेचं व्रत करताना दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Nagpur Court: थकीत फीसाठी विद्यार्थिनीला शाळेतून काढणे बेकायदेशीर; उच्च न्यायालय, शिक्षणाचा अधिकार सर्वोच्च अधिकार असल्याचे निरीक्षण

लोकप्रिय अभिनेत्रीला मालिका सेटवर अपमानास्पद वागणूक; स्वत:च केला मोठा खुलासा!

Latest Marathi News Live Update : हिंमत असेल तर वाळू माफिया बंद करा!" ; एकनाथ खडसेंचं सरकारला थेट चॅलेंज

नवरा असावा तर असा! घरातील काम करताना दिसले अविनाश नारकर, Viral Video होताच कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT