rang majha vegla, rang majha vegla promo SAKAL
मनोरंजन

Rang Maza Vegla वर सडकून टीका होऊनही प्रोमो झाला हिट.. नंबर दोनवर ट्रेंड.. नेटकरी म्हणाले...

रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन ट्विस्ट तितकासा आवडला नाही

Devendra Jadhav

Rang Majha Vegla News: रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन प्रोमो काल रिलीज झाला. या प्रोमोवर प्रेक्षक मात्र नाराज झाले. प्रोमो प्रेक्षकांना तितकासा आवडला नाही. मालिकेच्या प्रोमोत १४ वर्षांचा लीप आला असून कार्तिक जेलमधून बाहेर येतो.

दीपा आणि सौंदर्या त्याला भेटायला येतात. १४ वर्षांनंतर दीपिका आणि कार्तिकी आता मोठ्या झाल्या आहेत. त्या दोघी सुद्धा बाबा म्हणून कार्तिकला मिठी मारतात. पण कार्तिक मात्र बदला घेण्याच्या मुड मध्ये आहे.

(Rang Majha Vegla became a hit despite heavy criticism, Trending at number two)

प्रेक्षकांना रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन ट्विस्ट तितकासा आवडला नाही. मालिकेत फक्त सुडाचं षडयंत्र दाखवलं जातं अशा शब्दात प्रेक्षकांनी रंग माझा वेगळा वर सडकून टीका केलीय.

असं जरी असलं तरीही प्रोमो मात्र सोशल मीडियावर हिट झालाय. यु ट्यूब वर रंग माझा वेगळाचा प्रोमो दोन नंबरवर ट्रेंडला गेलाय. त्यामुळे एका अर्थी निगेटिव्ह पब्लिसिटीचा रंग माझा वेगळा मालिकेला फायदा झालाय.

लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा'ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेले कित्येक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकत टीआरपी मध्ये पहिला नंबर कायम राखला. पण आता मात्र हे गणित बदलणार असं दिसतंय.

दीपा कार्तिकच्या दुसऱ्या लग्नानंतर आता कुठे सगळं काही ठीक होईल अशी प्रेक्षकांना आशा होती. पण मालिकेत ट्विस्ट काही संपत नाहीयेत.

दीपा कार्तिकचा सुखी संसार पाहायला मिळणार अशी आशा वाटत असतानाच हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पचनी पडत नाहीये. 'रंग माझा वेगळा' चा महाएपिसोड रविवार ५ मार्च दु. १:०० आणि रा. ८:०० वा. Star प्रवाहवर बघायला मिळणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT